श्री.गो.से .हायस्कूल पाचोरा येथे प्लास्टिक मुक्त अभियान अंतर्गत चित्रकलेच्या माध्यमातून यशस्वी प्रयोग

श्री.गो.से .हायस्कूल पाचोरा येथे प्लास्टिक मुक्त अभियान अंतर्गत चित्रकलेच्या माध्यमातून यशस्वी प्रयोग

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा येथे इयत्ता 6 वी पाठ.19.”मले बाजाराला जायाचं बाई”
या पथनाट्य पाठात प्लॅस्टिक च्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे गटारी तुडुंब भरतात, ते खाऊन जनावरे,जलचरे मरतात, शेतात पीक येत नाही ही सत्य परिस्थिती पाठातील स्त्री मांडत आहे.
तोच संदर्भ घेऊन 6वी इ च्या वर्गशिक्षिका चित्रकला शिक्षिका जे. एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून कापडी पिशव्या, कागदी पिशव्या, विशेषतः टाकाऊ पासून टिकाऊ पिशव्या तयार करून घेतल्या.
आणि विद्यार्थ्यांना पर्यावरण वाचविण्यासाठीमोलाचा संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीचा अनुभव आला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पी एम वाघ,उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल ज्येष्ठ शिक्षक प्रीतमसिंग पाटील . चित्रकला शिक्षक सुबोध कांतायन उपस्थित होते