रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना दिनी महाराष्ट्रात सुट्टी जाहीर – आमदार सत्यजीत तांबेंच्या मागणीला यश

रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना दिनी महाराष्ट्रात सुट्टी जाहीर
– आमदार सत्यजीत तांबेंच्या मागणीला यश
– मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होता मागणी

प्रतिनिधी,

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी १५ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली होती. ही मान्य करत मुख्यमंत्र्यांनी राज्यात प्राणप्रतिष्ठापना दिनी होणाऱ्या सोहळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी सार्वजिक सुट्टी जाहीर केली आहे.

सर्व लोकांना रामलल्ला प्राणप्रतीष्ठापना दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी हा दिवस देशभरात दिवाळीसारखा साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. केंद्र सरकारने अर्धा वेळ सुट्टी जाहीर केली आहे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्ताने राज्यातील सर्व लोकांना या आनंदाच्या क्षणात सहभागी होता यावं तसेच राज्यात असलेल्या या उत्सवी वातावरणामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी लक्षात घेऊन लोकांना होणारा त्रास टाळावा या दुहेरी हेतूने आमदार सत्यजीत तांबेंनी पत्राद्वारे ही मागणी केली होती.

प्राणप्रतिष्ठापना दिनी सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील सर्वच शहरांमध्ये आणि गावांमध्ये मिरवणुका, आतषबाजी आणि उत्सवाचं वातावरण असेल, तसेच सर्वच लोकांना या उत्सवात सहभागी होता यावे यासाठी सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.