श्री समस्त जळगांव बारी पंच यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
जळगाव-बारी समाज उपवर वधूंसाठी समुपदेशन समिती नेमणार दिनांक १४ जानेवारी २०१४ श्री समस्त जळगांव बारी पंच यांची सन २३-२४ साठी ची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता समाजाचे जोशी पेठ येथील हितावर्धिनी हॉल येथे संपन्न झाली सभेची सुरुवात समाजाचे आद्य संत श्री संत रुपलाल महाराज यांच्या प्रतिमापूजन करून झाली सभेचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री विजय काशिनाथ बारी यांनी मांडले संस्थेचा मागील वर्षाचा अहवाल संस्थेचे खजिनदार
बालमुकुंद बारी यांनी सादर केला संस्थेच्या आगामी काळातील दोन महत्त्वाचे ठराव मांडून सर्व समितीने तो मंजूर करून घेण्यात आला त्यात समाजाने समाजभवनासाठी मन्यारखेडा शिवारात समाजभवनाचे निर्मिती कार्य सुरू झाले आहे त्याची आगामी रूपरेषा आखण्यात आली आणि दुसरा ठराव म्हणजे समाजातील आगामी काळातील उपवर आणि उपवधू यांचे विवाहपूर्व समुपदेशन करण्यासाठी समाजातील पाच प्रतिष्ठित सदस्य समिती व त्यास दोन कायदेतज्ञ अशा प्रतिष्ठित नागरिक मार्गदर्शन म्हणून नियुक्त करण्याचा ठराव मांडून सर्वानुमते मंजूर करण्यात करून घेण्यात आला सभेप्रसंगी समाजातील विविध समस्या आणि त्यावर उपाययोजना यावर सविस्तर हितगुज करण्यात आली तसेच सन 2024-25 साठी संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात अध्यक्ष-अरुण रामा बारी,उपाध्यक्ष-नितीन सुधाकर बारी,सचिव-महेंद्र घनश्याम बारी,उपसचिव-विजय काशिनाथ बारी,खजिनदार-बालमुकुंद शांताराम बारी,सह खजिनदार लतीश सुभाष बारी,प्रसिद्ध प्रमुख-राजेंद्र अरुण बारी,सदस्य विजय पुना बारी,सीए राहुल प्रकाश पाटील,सागर एकनाथ बारी,हर्षल शालिग्राम बारी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली तथासभेस उपस्थित समाजाच्या जेष्ठ समाजसेविका मंगलाताई बारी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक श्री वसंत बारी,बुधो बारी,अतुल भाऊ बारी,जितेंद्र बारी,भूषण बारी,सुनील बारी,ललित बारी यांचे सहकार्य लाभले.