बारी समाजाचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
प्रतिनिधी जळगाव
बारी बरई समाजाचे ऑक्टोबर महिन्यात श्री संतनगरी शेगावात बारी समाजाच्या राष्ट्रीय स्तरावर महाअधिवेशन घेण्यात आले होते . त्याप्रसंगी सर्व आमदार, खासदार, विरोधी नेते व मा.मंत्री महोदय उपस्थित होते.
या अधिवेशनात खालील ठराव घेण्यात आले त्यावर .मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेतली आहे.परंतु गेल्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित होऊ शकला नाही. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मीटिंग लावण्याची विनंती मान्य केली आहे.
तरी बारी समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात याकरिता जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बारी पंच मंडळाचे अध्यक्ष विजय बारी माजी नगरसेविका शोभाताई बारी ,ज्येष्ठ समाजसेविका मंगलाताई बारी , सामाजिक कार्यकर्ते भरत बारी ,प्रा. नितीन बारी,अरुण बारी, लतेश बारी, भूषण बारी ,नरेंद्र बारी अतुल बारी ,भरत बारी,सागर बारी महेंद्र बारी , सी.ए .राहुल पाटील ,बालमुकुंद बारी, विजय फुसे ,नितीन बारी ,हर्षल बारी ,मयूर बारी, राजेंद्र बारी ,विशाल बुंदे, दीपक बारी , योगेश सुने, आदी उपस्थित होते.
समाजाच्या प्रमुख मागण्या.
अंजनगाव सुर्जी येथे राष्ट्रसंत रुपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे व शासन दरबारी महाराजांची जयंती व पुण्यतिथी साजरी करावी.
बारी समाज गरीब आणि होतकरू आहे त्यांना रोजगार मिळवण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे.
पानमळे व पानपिंपरी यांना पिकाचा दर्जा देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाला शासनाने भरपाई द्यावी.