चोपडा महाविद्यालयात गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार

चोपडा महाविद्यालयात गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयात दि.१३ ऑक्टोबर २०२३ रोजी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.के. एन.सोनवणे, वरिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, उपप्राचार्य एस. पी. पाटील, पर्यवेक्षक ए.एन. बोरसे, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक पी.एस.पाडवी आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मधुचंद्र लक्ष्मण भुसारे यांच्या ‘भाषा अनुवादित माईक प्रणाली’ व ‘डिजीटल हस्ताक्षर प्रणाली’ या दोन्ही उपकरण डिझाइनला भारत सरकारतर्फे पेटंट मिळाल्याबद्दल त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक संदीप देवरे यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम व संशोधन मंडळ, बालभारती , पुणे येथे मानसशास्त्र विषय समिती सदस्य म्हणून निवड झाली व सेट परीक्षा शिक्षणशास्र विषयात उत्तीर्ण झाल्याबद्दल या दोन्ही गुणवंत प्राध्यापकांचा संस्थेचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील म्हणाले की, ‘प्राध्यापकांनी विद्यार्थी विकासाबरोबरच संशोधनाच्याद्वारे सामाजिक क्षेत्रातही आपले योगदान देणे आवश्यक आहे. विद्यार्थी हित जोपासून व विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्य, जीवनमूल्य तसेच सामाजिक जाणीवा रुजविण्याचा सदैव प्रयत्न करावा.त्यातूनच सुसंस्कृत नागरिक निर्माण होतील’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार उपप्राचार्य एस.पी. पाटील यांनी व्यक्त केले.