सुवर्णसिंग राजपूत यांना सेवापूर्ती निमित्ताने निरोप
पाचोरा – येथील विश्वासराव पवार ट्रस्ट संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयातील पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत यांना नियत वयोमानानुसार झालेल्या सेवानिवृत्ती निमित्त संस्थेतर्फे निरोप देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशील पवार अध्यक्षस्थानी होते.
दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने निरोप समारंभाला सुरुवात झाली. प्रा प्रतिभा परदेशी यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले.
या प्रसंगी व्यासपीठावर माणिकराजे पवार ट्रस्टच्या अध्यक्षा वंदनाताई पवार, विश्वासराव पवार ट्रस्टच्या सचिव रूपालीताई जाधव, विश्वस्त रवींद्र चव्हाण, हर्षजित पवार, विश्वजीत पवार, प्रमोद गरुड , प्राचार्य डॉ. बी. एन. बापू पाटील, राजेंद्र पाटील माजी प्राचार्य ठाणे, ह. भ. प. कोमलसिंग महाराज धुळे, उपप्राचार्य डी.पी. वाणी. प्रा. मनीष बाविस्कर, खडकदेवळा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे, पर्यवेक्षक श्रीमती कुंदा पाटील- शिंदे, महेंद्रसिंग जाधव (मुरबाड), शुभांगी जाधव मॅडम (मुरबाड), रमेश सोनवणे, जामसिंग राजपूत (चाळिसगांव), बापु राठोड (धुळे), मंगेश पाटील (मुख्याध्यापक माळशेवगे), समाधान पाटिल साहेब गट शिक्षणाधिकारी पाचोरा, डॉ रुपेशदादा पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती शेलार मॅडम (नगरदेवळा), पंडित कुंभार मुख्याध्यापक ( प्राथमिक विद्या मंदिर), माजी मुख्याध्यापक सुधीर पाटिल, प्रा. सी. एन. चौधरी सर, पत्रकार अनिलआबा येवले, नेरी, नगरदेवळा, खाजोळा, निंभोरी, पहुर हायस्कूल चे शिक्षक संजय पाटील, गोकुळ पाटील, ठाकरे सर, अजबसिंग पाटील, प्राचार्य संजय पवार, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर बंधु-भगिनी, त्यांच्या कार्यकाळातील सर्व सेवानिवृत्त शिक्षक सहकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
सुवर्णसिंग राजपूत यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली. व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील सर्व मान्यवर पदाधिकारी व सेवेकरी बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. उज्वला महाजन यांनी प्रास्ताविक तर आर. ओ. पाटील यांनीं आभार मानले.