शिंदे इंटरनॅशनल स्कूल चा बास्केटबॉल संघ राज्यस्तरावर
पाचोरा- महाराष्ट्र शासन व जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या विद्यमाने दरवर्षी विविध खेळांचे आयोजन करण्यात येते.
या वर्षी ही या वर्षी आयोजित क्रीडा स्पर्धेत पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार खेळ करत राज्यस्तरावर आपला प्रवेश नोंदवला.
विभाग स्तरीय स्पर्धा नाशिक येथे पार पडल्या. या स्पर्धेसाठी एकुण १० संघ आलेले होते. या स्पर्धेत जळगाव मनपा, नाशिक शहर व मालेगाव या संघांवर शिंदे इंटरनॅशनल स्कूल ने एकतर्फी विजय मिळवला.
शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या १४ वर्षाखालील बास्केटबॉल संघाने विभागीय स्पर्धेत विजय मिळवत नविन किर्तीमान विक्रम स्थापन केला. आज पर्यंत जळगाव जिल्हातून कोणताही संघ बास्केटबॉल स्पर्धेत विभागावर विजयी झालेला नव्हता.
शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हा भिमपराक्रम केला. सदर संघात धैर्यशील पाटील, ब्रिजेश पाटील, प्रथमेश पाटील, यशोदीप पगारे, अभिजित पगारे, विराज पाटील, संकेत मांडोळे, नैतिक चव्हाण, देवेश पाटील, रोहन मुराडे, सिध्दार्थ पाटील, वेदांत माळी, यांचा समावेश होता.
गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तात्यासो पंडीतराव शिंदे, उपाध्यक्ष निरज मुणोत, सचिव ॲड. जे. डी. काटकर, सह सचिव प्रा. शिवाजी शिंदे, प्राचार्य डॉ. विजय पाटील, क्रीडा शिक्षक जावेद शेख, सुशांत जाधव, सौ. मंगल गोडसे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.