मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ अंतर्गत
ऑक्सिजन निर्मिती उद्योगांना विशेष प्रोत्साहन मिळणार
जळगाव, दि. 31 – महाराष्ट्रासह भारत देश कोरोना महामारीचा सामना करीत आहे. राज्यामध्ये कोविड-19 महामारीमुळे प्राणवायु (मेडिकल ऑक्सिजन) तुटवडा वाढला आहे. भविष्यात राज्यासाठी प्रतिदिन 2300 मे. टन प्राणवायु पुरवठ्याची आवश्यकता राहणार आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाने “मिशन ऑक्सिजन स्वावलंबन” अंतर्गत ऑक्सीजन निर्मिती उद्योगांसाठी विशेष प्रोत्साहने अनुज्ञेय करणेबाबत २१ मे, २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
या शासन निर्णयानुसार प्राणवायु निर्मिती उद्योजकांना नवीन तसेच विस्तारीकरण प्रकल्प उभारणीस शासन विशेष प्रोत्साहन देणार आहेत. याचा लाभ प्राणवायू निर्मिती उद्योजकांनी घ्यावा. असे आवाहन उमेशचंद्र दंडगव्हाळ, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.