श्री .गो.से .हायस्कूल ,पाचोरा येथे शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्न
पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री.गो.से .हायस्कूल. येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सभेला जवळजवळ शंभरच्या आसपास पालक उपस्थित होते. सुरुवातीला विद्येचे देवता सरस्वती पूजनाने झाली, शिक्षणाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पूजन करण्यात आले. शाळेतर्फे सन्मान व सत्कार पालकांचा करण्यात आला त्यामध्ये गौरी भट, सुलभा सोनार, नीरज पाटील यांचा प्रतिनिधी स्वरूपात सत्कार करण्यात आला. पालकांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनास शाळेतील शिक्षक रवींद्र बोरसे यांनी शाळेविषयी ,शाळेतील उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांच्या समस्या, वाढता मोबाईलचा वापर याविषयी पालकांची संवाद साधला, कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत उपमुख्याध्यापक एन .आर. पाटील. यांनी विद्यार्थी हाच आमचा सर्वांगीण विकास असून शाळेतील विविध उपक्रमांमार्फत होणाऱ्या स्पर्धा परीक्षांची सविस्तर माहिती दिली व विद्यार्थ्यांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन पालकांना केले. मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक -पालक सभा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थी हजेरी,शालेय शिस्त,शालेय पोषण आहाराचे महत्त्व, विद्यार्थ्यांचा सहशालेय उपक्रमातील सहभाग ,विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास, बाल हक्क व लैंगिक शोषण, विद्यार्थ्यांची मानसिकता इ…अनेक विषयांवर यावेळी चर्चासत्र घेण्यात आले.भाषणात शाळेतील मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांनी शाळेचा शैक्षणिक विकास विद्यार्थ्यांची भौगोलिक परिस्थिती, वाचन लेखन वर्ग, पालकांची सुसंवाद, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक प्रितंसिंग पाटील, श्रद्धा पवार, संगीता वाघ, प्रमोद पाटील उपस्थित होते. शिक्षकांतर्फे ज्येष्ठ शिक्षिका श्रद्धा पवार मॅडम यांनी नवीन शैक्षणिक धोरण व पालकांची जबाबदारी, विद्यार्थ्यांमध्ये वयोमानानुसार होत असलेले बदलय याविषयी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ श्रेष्ठ पालकांचा सत्कार करण्यात आला. काही पालकांनी प्रतिक्रिया दिल्या व शाळेचे आभार मानले. शाळेत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा व विद्यार्थी सर्वांगीण विकास यावर सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व आभार मानले. यापुढे आम्ही मुलांना मोबाईल देणार नाहीत अशा आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाच्या आभार संगीता वाघ .यांनी मानले.