आय टी इंजिनियर गृहिणीच्या वाढदिवसानिमित्त शाळेला अनोखी भेट
पाचोरा–
जळगाव येथील आयटी इंजिनियर गृहिणीने आपल्या वाढदिवसानिमित्त माध्यमिक विद्यालय खडकदेवळा येथील शाळेला अनोखी भेट देऊन युवा पिढीसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. जळगाव येथे वास्तव्यास असलेल्या सौ. नम्रता हर्षदीतराजे पवार यांचा 2 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. आज-काल युवा पिढीमध्ये वाढदिवस म्हटला म्हणजे- पार्टी, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासाठी मेजवानी, तसेच केक कापून जल्लोष करण्याचा वार्षिक उत्सव समजला जातो. तर दुसरीकडे एखादा सामाजिक उपक्रम राबवून आनंददायी पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा प्रघात आहे.
सौ नम्रता पवार यांनी एक उदात्त विचार डोळ्यासमोर ठेवून माध्यमिक विद्यालय खडकदेवळा ता. पाचोरा या विद्यालयातील विद्यार्थ्यांची अध्ययन- अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ व सोयीची व्हावी या दृष्टिकोनातून शाळेतील प्रत्येक वर्गात एक पंखा आणि दोन ट्यूबलाइट सेट्स भेट दिल्या खडकदेवळा सारख्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये या देणगीच्या माध्यमातून प्रत्येक वर्गात भरपूर मोकळी हवा, आणि मुबलक प्रकाश मिळणार असल्याने विद्यार्थ्यांचे अध्ययन निश्चितच प्रभावी होणार आहे.
सौ नम्रता पवार यांनी आपल्या दातृत्वातून ग्रामीण भागातून उच्चपदस्थ नोकरीस असलेल्या युवा पिढीसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रम प्रसंगी, संस्थेच्या सेक्रेटरी श्रीमती रूपाली जाधव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे, श्री हर्षजीतराजे पवार, विश्वस्त प्रमोद गरुड, शिक्षक वाय. बी. परदेशी, सुभाष जाधव, चंद्रकांत पाटील, एस.वाय. देसले, ए.टी. घोडेस्वार, निवृत्ती बाविस्कर, ईश्वर पाटील, अविनाश पवार , सुनील गुजर, सागर परदेशी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.