एम. एम. महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ‘मेरा देश, मेरी मिट्टी’ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम
पाचोरा दि. 15 -पाचोरा येथील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने शासनाच्या ‘मेरा देश, मेरी मिट्टी’ या कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा कार्यक्रम संपन्न झाला. दरवर्षी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करून पर्यावरण संवर्धनाची जागृती करण्यात येते. या वेळी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी सौ. क्रांती पाटील (अवर सचिव, मंत्रालय मुंबई), श्री. भावेश जोशी (प्रशासकीय अधिकारी, एम. एम. आर. डी. मुंबई), श्री. शरद पाटील (उपायुक्त जी.एस.टी. विभाग), नानासाहेब व्ही. टी. जोशी (व्हा. चेअरमन पी..टी. सी. पाचोरा), नानासाहेब सुरेश देवरे (चेअरमन, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समिती), प्राचार्य प्रा. डॉ शिरीष पाटील, माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. एस. एस. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. बी. तडवी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आर बी. वळवी तसेच महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.