नाशिक विभागीय आयुक्तांनी साधला विद्यार्थ्यांशी सहज संवाद
विद्यार्थ्यांच्या महसूल विषयक प्रश्नांचे साध्य-सोप्या भाषेत माहिती देत समाधान
जळगाव, दि.२ ऑगस्ट महसूल सप्ताहाच्या युवा संवाद कार्यक्रमात नाशिक महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांंनी मुळजी जेठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी जळगाव आकाशवाणी केंद्रावर मनमोकळा साधला. विभागीय आयुक्तांनी साध्या-सोप्या भाषेत साधलेल्या सहज संवादामुळे विद्यार्थी भारावून गेले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आदी उपस्थित होते. महसूल विषयक विविध प्रश्नांची विभागीय आयुक्तांनी साध्या सोप्या भाषेत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
महसूल दिवस, महसूल सप्ताह,
महसूल विभागामार्फत लोकांशी निगडीत कोणती कामे केली जातात. महसूल विभागाचा इतिहास काय आहे. शेतक-यांना ७/१२ चे महत्त्व काय आहे. आज काल जगामध्ये सगळीकडे तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सदरील तंत्रज्ञानाचा वापर आपण शेतक-यांचा समस्या सोडविण्यासाठी कसा करता येईल. त्याबाबत आज कोणकोणत्या योजना आहे ? ७/१२ संगणकीकरणमध्ये शासनाला व शेतक-यांना काय फायदा आहे. ई-हक्क प्रणाली म्हणजे काय आहे. त्यांचे फायदे काय आहेत.
ई-हक्क प्रणालीचा शेतकरी कसा वापर करु शकतो व त्यांचा फायदा काय आहे. ई- हक्क प्रणालीमध्ये कोण-कोणत्या नोंदी शेतकरी मोबाईलद्वारे करु शकतो. ई-पिक पाहणी काय आहे. ई पीक पाहणीचा शेतक-यांना काय फायदा आहे. ई-चावडीमुळे शेतक-यांना व शासनाला काय फायदा होणार आहे. कालबाहय नोंदी म्हणजे काय आहे. ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील कालबाह्य फेरफार नोंदी कमी करण्याबाबतची कार्यपध्दती काय आहे. ई-मोजणी प्रणाली काय आहे त्यांचा काय फायदा झाला. ई-मोजणी मध्ये सध्या कोण-कोणत्या आधुनिक उपकरणाचा समावेश आहे . पोटखराब जमीन, यामध्ये कोण-कोणते प्रकार आहेत. पोटखराब शेतजमीन वहितीखाली आणण्या करीता शेतक-यांनी कोठे अर्ज करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम शेतसारा भरण्यासाठी तलाठी/महसूल अधिकारी यांचेकडेस प्रत्यक्षात जावे लागते का ? १९६६ चे कलम ४२ व काय आहे व त्यांचा जमीन मालकास काय फायदा होतो. भोगवटादार वर्ग २ जमीन म्हणजे काय व त्यामूळे शेतक-यांना काय अडचणी येतात. अशा महसूल विषयक प्रश्नांची विभागीय आयुक्तांनी विविध उदाहरणांसह माहिती दिली.
जयश्री खैरनार, प्रतिक वरयानी, ओम थोरात, तुषार महाजन, भूमी सोनार, गुणवंत बोरसे, तेजस्विनी न्हावी, तेजल अत्तरदे , मुकेश राठोड, अखिलेश तिवारी, दुष्यंत तिवारी या विद्यार्थ्यांनी संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला.
‘माझं शेत, माझं शिवार’ या जळगाव आकाशवाणी केंद्रावर २ ऑगस्ट रोजी या युवा संवाद कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.