महाराष्ट्र शासनाने पत्रकारांचा विमा निर्णयाच्या स्वागतार्थ आमदारांचा सत्कार
पाचोरा पत्रकार कक्षासाठी आ.किशोरआप्पा यांना निवेदन
पाचोरा-महाराष्ट्र सरकारने नुकताच पत्रकारांचा विमा काढण्याचा निर्णय घेतल्याचे जाहिर केल्याने या निर्णयाच्या स्वागतार्थ पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांचा पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर पत्रकारांसाठी मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय उपलब्ध व्हावे यासाठी मागणी करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,पाचोरा येथील सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या पत्रकार संघटना, गट, संघ या सर्वांच्या एकजुटीने दि.21 जुन 2023 बुधवार रोजी सायं.4.30 वाजता पाचोरा शहरातील हुतात्मा स्मारकात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वर्षभरापुर्वी पत्रकारांच्या समस्यांसंदर्भात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याशी विविध विषयांवर व प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली होती. यापैकी महाराष्ट्र शासनाने नुकताच पत्रकारांचा विमा काढण्याचा निर्णय जाहिर केल्याबद्दल सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार किशोरआप्पा यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर सदरचा विमा अधिस्वीकृती कार्डधारक पत्रकारांसोबतच जे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीया यांच्या संदर्भात देखिल योग्य ते नियम-अटी निश्चीत करून त्यांचा देखिल शासनाच्या वतीने विमा काढण्याबाबत मागणी करण्यात आली.
तसेच पाचोरा शहर व तालुक्यातील पत्रकारांसाठी मध्यवर्ती ठिकाणी अशी कोणतीही योग्य जागा नसल्याने आजपर्यंत पत्रकारांना घर-घर लागली आहे. त्यामुळे पाचोरा शहरातील हुतात्मा स्मारकासमोरील महात्मा गांधी वाचनालयाचे जे जुने गेट होते याठिकाणी मध्यभागी भिंत बांधून सदरची जागा मोकळ्या स्वरूपात पडली आहे. ती जागा पाचोरा नगरपालिका मिडीया कक्ष नावाने उभारण्यात यावे व सदरची जागा पत्रकारांसाठी उपलब्ध करून द्यावी या मागणी संदर्भात सर्व पत्रकार बांधव लवकरच अधिकृत निवेदन देवून न.पा.प्रशासनासह शासनाकडे मागणी करणार असून यासाठी स्थानिक आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यासह सर्व पक्षीय राजकीय पदाधिकारी , राजकीय मान्यवरसह अधिकारी व नेत्यांचे सहकार्य मिळण्यासाठी पत्रकारांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करण्यात आली.