नांद्रा सह परीसरात वादळा सह पाऊसाने झोडपले फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

नांद्रा सह परीसरात वादळा सह पाऊसाने झोडपले
फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान.खेडगाव (नंदीचे) येथे गारांसह पाऊस
डोळ्या समोर उद्धवस्थ होणाऱ्या बागा पाहून शेतकरी हवालदिल.

बातमी सेवा राजेंद्र पाटील नांद्रा (ता.पाचोरा)ता.४ रोजी दुपारी बारा च्या सुमारास उकाळाची तीव्रता दमट वातावरणात अचानक आकाशात ढग भरून आले.आणि काही मिनिटांतच शेतकरी शेतीकामात व्यस्त असतांनाच सुराट वारा सुटला व पाऊसानेही झोडपले.रोहिणी नक्षत्रातील या वादळीवाऱ्यासह पाऊसाने मोठं मोठी झाडे उन्मळून पडली, आंब्याच्या कैऱ्याचा ठिग लागला, खेडगाव (नंदीचे) येथे गारांसह पाऊस व वादळात ने घरांची व खैवाळीतील पत्रे उळाली.लागवड झालेल्या कापूस पिकांसह , लिंबू,मोसंबी,पेरु,केळी,पपई,या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.कुरंगी गिरणा काठावर असलेल्या सोनटेक शिवार ,दुसखेडा, खेडगाव, वडगाव,नांद्रा,माहेजी,बांबरुड(राणीचे)या गावांसह सर्वच ठिकाणी फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शासनाने फळबागांच्या नुकसानींचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
पाच ,दहा वर्षे पोटच्या पोरांसारखे उन्हाळा,पाऊसाळा,हिवाळा,अशा तिनही रुतू मध्ये या फळबागांचे संगोपन करून अर्थी तासात संपूर्ण बाग उद्धवस्थ झाली हेच दुर्दैव……
सुनिल नारायण पाटील शेतकरी कुरंगी