पाचोरा तालुक्यातील लाख येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
येथून जवळ असलेल्या लाख येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमचे आयोजन समुह सहाय्यक सतिष परदेशी व कृषि सहाय्यक अशोक भोई यांनी केले होते. कार्यक्रमात शेतकरी बांधवांना कृषि विभागाच्या विविध योजनांची अशोक भोई यांनी माहिती दिली. तसेच महाडिबीटी अर्ज नोंदणी, खरीप हंगाम पीक, बाजरी पिक प्रात्यक्षिक, लाभार्थी निवड, पीएमएफएमई तसेच महाबीज, जैविक खत व बुरशीनाशक औषधी यासह एमआरईजीएस फळबाग, फळबाग लागवड, महाडिबीटी योजनेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, पॅक हाऊस, भाऊसाहेब पांडुरंग फुंडकर, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळे, पीएमएफएमइ, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प पोखरा योजनेअंतर्गत ठिबक व शेडनेट, शेततळे, रेशीम शेती, मधुमक्षिका पालन इत्यादी योजनांची माहिती व सोयाबीन उगवण क्षमता चाचणी याविषयी सखोल माहिती देत कृषी पर्यवेक्षक के एन घोंगडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले व त्यासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास परिसरातील शेतकरी भागचंद चव्हाण, राजू पाटील, वामन पाटील, देविदास सोनवणे, शिवराम चव्हाण, मेहराम राठोड, विनोद चव्हाण, विक्रम चव्हाण, चिंतामणी इंगळे, रूपचंद राठोड, आदी शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन सतिष परदेशी यांनी केले.