पाचोरा पोलिस स्थानकात दाखल असलेल्या गुन्ह्यात पत्रकार राहुल महाजन यांची जिल्हा न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता!
● ऍड.मानसिग सिद्धू यांचा जोरदार युक्तिवाद.
पाचोरा येथील पत्रकार राहुल महाजन हे २०१६ साली पाचोरा पोलीस स्थानकात बातमी संदर्भात माहिती घेण्यासाठी गेले असता त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी कलम ३५३ प्रमाणे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये मध्ये जळगाव जिल्हा न्यायालयाने सखोल चौकशी करून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि सन २०१६ साली बातमी संदर्भात माहिती घेण्यासाठी गेलेले पत्रकार महाजन यांच्यावर पाचोरा येथील पोलीस निरीक्षक यांच्या दबावाखाली येऊन पोलीस कर्मचारी यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या केसमध्ये जळगाव येथील न्यायधीश बोहरा साहेब यांच्या न्यायालयाने दोन्ही पक्षकारांनी बाजी समजून घेत हा निकाल दिला आहे. यामध्ये पाचोरा येथील प्रख्यात वकील ऍड. मानसिंग सिद्धू यांनी बचाव पक्षाची बाजू मांडून जोरदार युक्तिवाद केला असून पत्रकार राहुल महाजन यांच्यावर कश्या पद्धतीने पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला होता हे कोर्टासमोर मांडले असता यावर न्यायालायने खऱ्या पत्रकारितेला योग्य न्याय देऊन लोकशाही जिवंत ठेवली आहे. यासाठी ऍड.मानसिग सिद्धू तसेच त्यांचे सहकारी ऍड.प्रशांत भावसार यांनी कामकाज पहिले होते.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता असून देशात आणि राज्यात अनेक पत्रकारांवर देखील अश्याच प्रकारे खोटे गुन्हे दाखल होतात यावर देखील अंकुश बसने गरजेचे विषय बनला आहे. अनेक शासकीय अधिकारी हे कलम ३५३ चा दुरुपयोग करीत असून शासनाचा व कोर्टाचा विनाकारण वेळ जातो. अश्या घटनेमध्ये योग्य ती चौकशी करूनच गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकार संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.