आमदार किशोर पाटील हेच खरे भूखंड माफिया चोर :अमोल शिंदे
———————————————————–
आमदार किशोर पाटील म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : अमोल शिंदे
——————————————————–
पाचोरा-
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. या निवडणूक दरम्यान 24 एप्रिल रोजी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी घेतलेल्या मेळाव्यात आमदार किशोर आप्पा पाटील व माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्यावर पुराव्यानिशी आरोपांच्या फेरी झाडल्या होत्या. याला प्रत्युत्तर देण्याऐवजी आमदार किशोर पाटील यांनी आज पाचोरा येथे झालेल्या त्यांच्या मेळाव्यात आरोपांना बगल देत शिवराळ भाषेत अमोल शिंदे यांचा समाचार घेतला. आमदारांच्या या प्रतिकियेवर प्रत्युत्तर देताना अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील म्हणजे “चोराच्या उलट्या बोंबा” असून आगामी काळात खरा “भूखंड माफिया चोर” म्हणजे आमदार किशोर पाटील हेच आहेत -असे ठासून सांगितले. आमदारांना माझा आरोप खोडायचा असेल तर त्यांनी पुराव्यानिशी जाहीर बोलावे, अन्यथा आमचे आरोप मान्य आहेत असे आम्ही समजू- या भाषेत खडसावले.
भाजपा पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलच्या मेळाव्यात तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या अपहार व अनियमित्यबाबत आजी-माजी आमदारांवर पुराव्यासह आरोप केले होते. आज तारीख 26 रोजी झालेल्या आमदार पाटील यांच्या मेळाव्यात त्यांना आरोपांचे खंडन होईल असे वाटले होते मात्र प्रत्यक्षात असे न होता आमदारांनी केवळ शिवराळ भाषा वापरून त्यांच्यावर पुन्हा नवीन आरोप केले. आमदारांच्या या नवीन आरोपांच्या बाबतीत अमोल शिंदे यांनी आज सायंकाळी चार वाजता तातडीची पत्रकार परिषद घेऊन आपण त्यांच्यावर व त्यांनी आपल्यावर केलेले आरोप सिद्ध करावे असे खुले आव्हान दिले. आमच्या आरोपांना उत्तर देऊ न शकणारा आमदार हा एक नंबरचा खोटारडा आमदार आहे, असे म्हणत आमदारांचे भाषण म्हणजे “चोराच्या उलट्या बोंबा” आहेत. तसेच खरा “भूखंड माफिया चोर” म्हणजे आमदार किशोर आप्पा पाटील हेच आहेत हे आम्ही सिद्ध करून दाखवू असे अमोल शिंदे यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना अमोल शिंदे यांनी त्यांच्या मेळाव्यात उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे पुन्हा एकदा वाचन करून दिले. या सर्व आरोपांचे स्पष्टीकरण करत असताना अमोल शिंदे यांनी आमदारांचा अत्यंत शांत पद्धतीने खरपूस समाचार घेतला. आमदारांवर व त्यांच्या संचालकांवर पुराव्यानिशी आरोप करताना अमोल शिंदे यांनी आमदार पाटील यांना “इज्जत व नैतिकता गमावलेला माणूस”, “खोटे बोलण्याचा शुद्ध धंदा असलेला माणूस”, “खूप कमी ज्ञान असलेला आमदार”, “अपूर्ण माहितीवर बोलणारा आमदार” – असे विविध विशेषण लावलीत. याशिवाय मेळाव्यात बोलताना आमदार शुद्धीवर दिसत नसल्याचे सांगत त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पराजय दिसत होता असेही म्हटले.
आमदार पाटील यांनी आजच्या मेळाव्यात बाजार समितीच्या पाठीमागील भूखंड व शिंदे परिवाराचा मोंढाळा रोडवर मोठी शेती आहे, दोन नवीन आरोप केले. या आरोपांची खिल्ली उडवत अमोल शिंदे यांनी सांगितले की, “मार्केटच्या पाठीमागील जागा अमोल शिंदे यांनी घेतल्याचे आमदार किशोर पाटील यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावे. आणि मोंढाळा रोडवर बाजार समिती आवारला योग्य अशी शिंदे परिवाराची 20 ते 25 एकर शेती असेल तर ती सिद्ध करावी. आम्ही आमच्या खर्चाने ती शेती आमदाराला मोफत दान करू”- असे सांगत आमदाराच्या आरोपाची हवाच काढून घेतली. आमदाराचे पॅनल या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाला राहणार असून पराभूत मानसिकतेतून ते आरोप करीत आहेत, असे अमोल शिंदे यांनी यावेळी सांगितले. अटल भाजपा कार्यालय पाचोरा येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला बाजार समितीचे माजी सभापती सतीश बापू शिंदे भाजपा सरचिटणीस गोविंद शेलार संजय पाटील कैलासआप्पा चौधरी,प्रदीप पाटील,जगदीश तेली,व इतर पदाधिकारी तसेच शेतकरी सहकार पॅनलचे उमेदवार उपस्थित होते.