पाचोरा पोलीस स्टेशनला रमजान महिना हनुमान जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न
पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ साहेब यांनी दिला शांततेचा सल्ला
( पाचोरा प्रतिनीधी )
” एप्रिल महिन्यात विविध सण, उत्सव साजरे होत असून हे सण आनंदाने साजरे करा. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाला सहकार्य करा.प्रत्येक धर्मियांनी आपापल्या सण उत्सवाचा आनंद द्विगुणीत करा. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी तत्पर असुन सण, उत्सव साजरे करताना सामाजीक शांतता व जातीय, धार्मीक एकता अबाधित ठेवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी केले. शांतता समिती व मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
भगवान महावीर जयंती, हनुमान विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी, सण, उत्सवा संदर्भातील गृह खात्याची नियमावली समजावून. द्यावी, मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांना कायदा व जबाबदारीची जाणीव करून द्यावी यासाठी सोमवारी दुपारी पोलीस ठाण्यात शांतता समिती सदस्य व विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी राहुल खताळ होते.
या बैठकीस पालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, रशीद देशमुख, सईद पंजाबी, शेख रसूल उस्मान ,अजहर खान ,मुन्ना पिंजारी, वीरेंद्र चौधरी, विनोद भोई, प्रकाश चौधरी ,रज्जू बागवान, संदीप महाजन, बंडू चौधरी, संदीप चौधरी, सतीश चौधरी, लक्ष्मण सूर्यवंशी, मिलिंद सोनवणे, अनिल येवले ,गणेश शिंदे यांचेसह समिती सदस्य, मंडळांचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. राहुल खताळ यांनी उत्सवा संदर्भातील गृह खात्याचे नियम, पोलीस कारवाई ,कायदा व सुव्यवस्था या संदर्भातील नियमावली स्पष्ट करून सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा, सामाजिक व जातीय तेढ निर्माण करणारे चित्र, मेसेज, व्हिडिओ क्लिप प्रसारित करू नये. अफवांवर विश्वास न ठेवता कळालेल्या घटने संदर्भात पोलिसांकडून खात्री करून घ्यावी अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देऊन पोलीस विभागास सहकार्याचे आवाहन केले. रशीद देशमुख, रसुल उस्मान, संदीप महाजन, अजहर खान, सतीष चौधरी,प्रकाश भोसले, संदीप महाजन, मिलिंद सोनवणे, गणेश शिंदे आदिंनी विधायक सूचना मांडल्या व सण, उत्सव, मिरवणुकां प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून शांतता व एकता अबाधित ठेवण्याची ग्वाही पोलीस विभागास दिली.बैठक यशस्वीतेसाठी गोपनीय शाखेचे नितीन सूर्यवंशी, सुनील पाटील, विनोद बेलदार, राहुल बेहेरे यांचेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पत्रकार संदीप महाजन यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. गोपनीय शाखेचे नितीन सूर्यवंशी यांनी आभार मानले.