पाचोरा येथे जिजाऊ ब्रिगेडतर्फे विविध स्पर्धा संपन्न
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एस. एस. एम. एम. महाविद्यालय पाचोरा येथे 12 जानेवारी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून जिजाऊ ब्रिगेडतर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पारितोषिक वितरण कार्यक्रमाची सुरवात जिजाऊ पुजन व जिजाऊ वंदनेने झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे जिजाऊ ब्रिगेडच्या जळगाव जिल्हाध्यक्षा लीनाताई पवार यांनी संघटनेची भुमिका मांडली. या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्षा सुचिताताईं पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जिजाऊ ब्रिगेड हे सशक्त वैचारिक संघटन असून स्त्री सक्षमीकरणाचे काम करते असे विभागीय संघटक प्रा. डॉ.सुनीता मांडोळे गुंजाळ यांनी सांगितले. मराठा सेवा संघाचे प्रा.डाॅ.माणिक पाटील, मराठा सेवा संघाचे एस ए पाटील यांनी उपस्थित विद्यार्थीनीना मार्गदर्शन केले.
महानायिकांच्या वेशभूषा या स्पर्धेत प्रथम सिद्धी कुलकर्णी, द्वितीय वैष्णवी पाटील, तृतीय भाग्यश्री जिरी, मनस्वी शेलार या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. निबंध स्पर्धेत प्रथम साधना पवार, द्वितीय अश्विनी पाटील, तृतीय यातिका पाटील, दिपाली मिस्तरी या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. पोस्टर स्पर्धेत प्रथम स्वप्नील चव्हाण, द्वितीय सानिया तडवी, तृतीय कादंबरी चौधरी, संजना वसावे या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. रांगोळी स्पर्धेत प्रथम मानसी भावसार व साक्षी शर्मा द्वितीय ज्योती राठोड व प्रिती राठोड, तृतीय यातिका पाटील व पौर्णिमा महाजन सुर्यवंशी व रूचीता पाटील या विद्यार्थिनींनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. वक्तृत्व स्पर्धेत तंजिला खाटिक प्रथम, सिद्धी कुलकर्णी द्वितीय, कादंबरी चौधरी तृतीय व हर्षदा पाटील उत्तेजनार्थ आल्या. सदर कार्यक्रमात विद्यार्थीनीकडून आई-वडिलांचा योग्य तो सन्मान राखण्याची शपथ घेण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरिष पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ वासुदेव वले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा जी. बी. पाटील, पर्यवेक्षक प्रा एस. एम. पाटील, मराठा सेवा संघाचे सुनील पाटील, कैलास पाटील, एस ए पाटील, सुधाकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे राजेद्र पाटील, कॉलेजचे प्रा एस एस पाटील, डॉ जे पी बडगुजर, प्रा. नितीन पाटील, प्रा स्वप्नील ठाकरे, प्रा प्रदिप देसले, प्रा गौरव चौधरी, प्रा गिरीश पाटील आदी प्राध्यापक उपस्थित होते.
जिजाऊ ब्रिगेडच्या प्रा डॉ. सुनीता गुंजाळ, जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा प्रा प्रतिभा पाटील, वंदना पाटील, ललिता पाटील, रंजना पाटील, मनिषा खोडके, ज्योती भावसार, प्रा सुवर्णा पाटील, प्रा क्रांती सोनवणे, प्रा सुनिता सोहत्रे, प्रा मनीषा माळी, प्रा विजया देसले, प्रा वासंती चव्हाण, प्रा छाया पाटील, प्रा सुजाता पवार, प्रा मनिषा पाटील, प्रा नूतन पाटील या सर्व प्राध्यापिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ अतुल सूर्यवंशी यांनी केले तर आभार वर्षा पाटील यांनी मानले. 🙏🏻