_न्यू इंग्लिश मेडियम स्कूल,कोळगाव येथे सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती उत्साहात साजरी…!!!!!_
कोळगाव ता.भडगाव(वार्ताहर)-कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,न्यू इंग्लिश स्कूल,कोळगाव येथे स्रियांसाठी शिक्षणाची कैवाडं उघडून ज्ञानाच्या गंगोत्री निर्मिती करणाऱ्या थोर समाजसुधारक,स्री क्रांतिकारक स्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या “सावित्रीबाई फुले” यांची १९२ वी जयंती उत्साहात पार पडली,स्कूलमधील चैतन्यरुपी कोंबानी आज ज्योतिराव फुले व सावित्रीबाईंचा हुबेहूब पेहराव करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलच्या शिक्षिका पुजा पाटील या होत्या तर दिपिका पाटील,रुपाली मोरे,पुनम महाजन,तेजस्विनी पाटील,निकिता पाटील,जनाबाई महाजन आदि उपस्थित होत्या,कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या प्रतिमेस श्रीफळ,पुष्पहार अर्पण तसेच पुजन करुन करण्यात आली.
सावित्रीबाई फुले यांनी समाजातील स्री शिक्षणासाठी तसेच अज्ञान व अंधश्रध्दा नष्ट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण अध्यक्षीय भाषणात पुजा पाटील यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस्विनी पाटील तर सुत्रसंचलन दिपिका पाटील यांनी केले तर आभार निकिता पाटील यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य सुनिल पाटील तसेच पर्यवेक्षक अनिल पवार,प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर,प्राचार्य सुनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.मनेष पाटील व चेतन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.