अंधारल्या डोळ्यात प्रकाश निर्माण करणारी बाई
म्हणजेच वैशालीताई
—————————————–
हे वैभवशाली सुंदर जग पाहण्यासाठी आपल्याला डोळ्यांची गरज भासते मात्र जर आपले डोळे म्हणजे दृष्टी कमकुवत असेल मोतीबिंदू झालेला असेल तर आपणास ही सुंदर सृष्टी दिसत नाही. व त्यासाठी डोळ्यांचा उपचार करावा लागतो आणि तो महागडा उपचार करण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात म्हणून समाजातील गरीब दुबळे लोकं उपचार करण्यासाठी डोळ्यांच्या डॉक्टरकडे जात नाहीत. हीच गोष्ट लक्षात घेऊन आपल्या तालुक्याची लेक तात्यासाहेब आर ओ पाटील यांची कन्या *सौ वैशालीताई सूर्यवंशी* (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या) यांनी दिनांक 13 डिसेंबर रोजी डोळ्यांचे भव्य तपासणी शिबिर घेतलं त्यामध्ये शेकडो रुग्णांचे डोळे तपासून मोतीबिंदू झालेल्या लोकांचे स्वखर्चाने कांताबाई नेत्रालय जळगाव येथे ऑपरेशन करून आणले, कमकुवत झालेली दृष्टी या लोकांना परत प्राप्त झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावला नाही. त्यांनी ताईंचे मनापासून आभार मानले अशा या परोपकारी समाजसेविकेला तालुक्याच्या लेकीस मनापासून मानाचा मुजरा…