असहाय्य तानाजीला देवदुतांच्या निस्वार्थ मदतीने जीवदान….!
पाचोरा ( प्रतिनिधी )
असहाय्य तानाजीला देवदुतांच्या निस्वार्थ मदतीने जीवदान
भडगाव पाचोरा-भडगाव तालुक्यातील बांबरुड(बुद्रूक)येथील रहीवाशी पीडीत तानाजी मालजी कोळी या समाजाच्या बांधवाला नासिक जिल्ह्यातील सिन्नर गावातील कंपनीत काॅन्ट्र्कदारकडे फ्रिज कं.च्या शेडला वेल्डींग काम करत असताना पंचवीस ते तीस फुटावरुन 11हजार व्हाॅल्टच्या मेन लाईन च्या तारेवर सीडी टच होऊन सदर वेंडरचे काम करत असलेले तानाजी कोळी बांधवाच्या अंगावर उष्णविज गुल उडुन त्याची छाती मान,हात,पोट भाजले गेले त्यांची विचारपूस तसेच सांत्वनासाठी नाशिक मधील आपले समाजाचे नाशिक कोळी महासंघाचे शहराध्यक्ष व समाजासाठी सतत निस्वार्थीपणाने धावुन येणारे समाजसेवक मा. श्री.युवराजजी सैंदाणे, आदरणीय श्री. नितिन दादा शेवरे,तसेच श्री कैलास भाऊ मोरे यांनी या पिडीत तरुणासाठी निस्वार्थपणे सहकार्य केले,,, व सदर पिडीत तरुणावर व त्यांच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळल्या सारखे झाले अश्या परिस्थितीत पुढील संघर्षासाठी ह्या समाज बांधवांनी संघर्ष करत सामना केला त्यावर आपल्या समाजाच्या त्या देवरुप बांधवांनी त्यांची बाजू उचलत ते कंपनीच्या ठेकेदाराला तसेच कंपनीशी संघर्ष सुरू करत त्यांना दवाखान्यात खुप सहकार्य केले,तसेच त्या पिडीत बांधवास त्या कंपनीत पर्मनंट नौकरीवर रुजु करण्यासाठी मदत केली खरच त्यांनी पिडीत कुटुंबास सतत निस्वार्थी पणाने न्याय मिळुन दिला त्यांचे पाचोरा-भडगाव तालुक्यातील समाज बांधवांकडुन खुप खुप धन्यवाद त्यासाठी भडगाव कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष श्री आण्णा रघुनाथ कोळी, जेष्ठ समाजसेवक प्रा.सुरेश कोळी सर, श्री.समाधान कोळी, आणि पाचोरा येथुन आपले श्री पि.के.आण्णा सोनवणेचे कनिष्ठ चिरंजीव श्री गजानन (बापुभाऊ) सोनवणे श्री.विजयजी बागुल(माजी सैनिक),आदिवासी वाल्मिकीलव्य सेनेचे शहराध्यक्ष,श्री.ज्ञानेश्वर बोरसे, तसेच श्री.राजेंद्र खैरनार यांनी बांबरुड पिडीत बांधवांवर कसे वाईट प्रसंग ऐकुन पाचोरा व भडगावातील बांधव जसे सुन्न होऊन गेले,व त्यांचे डोळे सुद्धा पानावले, भडगावचे अण्णा कोळी यांनी पाचोराचे समाज बांधवांना बोलावून तालुक्यातील बांबरुड येथील पीडित कुटुंबाची भेट आज दिनांक १७/११/२०२२ ला घेऊन नाशिक येथील श्री.युवराज जी सैंदाणे व त्यांच्या समाजाच्या मित्रगृप पदाधिकारी सदस्यांनी तानाजी कोळी या तरुणाला कश्या प्रकारे अप्रतिम सहकार्य केले त्याबद्दल आभार मानले तसेच लोहटारच्या कोळी समाजाच्या तरुणांवर पण अशीच वाईट घटना घडुन ते बांधव दगावले गेले,,,त्यात सुद्धा नाशिकच्या या बांधवांनी असेच सहकार्य केले होते.या सर्व दैवी देवदुताचे भडगाव पाचोरा कोळी महासंघाचे वतीने शतशः आभार व असेच श्री युवराज सैंदाणे जी सारखे “देवरुप” व त्यांचे सहकारी “देवरुप” प्रत्येक ग्रामिण, तालुक्यात, जिल्ह्यात लाभले पाहिजे आज ते तानाजी सुखरुप आहेत व त्यांचे पुढील भवितव्य पण पर्मंनंट नौकरी रुजु होऊन उज्वल झाले आहे,,,,