सणासुदीच्या काळात पाणी पुरवठ्यासाठी चोवीस तास विद्युत पुरवठा ची मागणी
राजेंद्र पाटील
नांद्रा(ता.पाचोरा)ता.२७ सध्या राज्यात हिवाळ्याची चाहूल व परतीच्या पावसामुळे शेतीसाठी लागणाऱ्या विद्युत पुरवठा ची मागणी मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे.तरीही पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना मात्र आठ तास थ्री फेज विद्युत पुरवठा केला जातो त्यामुळे सणासुदीच्या काळात पाणी पुरवठ्यावर परीणाम होतो म्हणून विद्युत पुरवठ्याच्या मागणी व वापर कमी झालेले असल्याने कमीत कमी सणासुदीच्या काळात तरी चोवीस तास थ्री फेज विद्युत पुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी विज वितरण कंपनीने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा व तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा योजनांना फटका बसतो त्यामुळे पाणीपुरवठा हा उशीरने होतो.म्हणुन सणासुदीच्या काळात तरी चोवीस तास थ्री फेज विद्युत पुरवठा सुरळीत चालू करण्याची मागणी होत आहे.