पाचोरा छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावात पुढचे धर्मवीर नाव काढण्याबाबत मराठा सेवा संघ व पुरोगामी संघटना वतीने न.पा. मुख्याधिकारी यांना निवेदन

पाचोरा छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावात पुढचे धर्मवीर नाव काढण्याबाबत मराठा सेवा संघ व इतर पुरोगामी संघटना वतीने नगरपालिका मुख्याधिकारी प्रशासक यांना निवेदन

पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसरात असलेले छत्रपती संभाजी महाराज स्मारक आहे
त्या स्मारका उल्लेख करताना धर्मवीर असे विश्लेषण लावून धर्मवीर संभाजी महाराज असे करण्यात आलेले आहे
भारतीय इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यास केला असता तर असे दिसून येते की महाराजांचे कार्य फक्त एका विशिष्ट धर्मासाठी कार्य केले नसून तर सर्व जाती धर्म अठरपगड जातीसाठी त्यांना न्यायाची भूमिका घेऊन आपले कार्य केलेले आहे
परंतु आपण त्यांचा उल्लेख करताना धर्मवीर असा विश्लेषण त्यांचे नाव पुढे लावल्याने त्यांना एक धर्मा पुरता मर्यादित ठेवून त्यांची भूमिका ही इतर धर्मीयांप्रती ही दुष्मनीची होते का?
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक छात्रविर, एक जागतिक राजकीय तत्ववेत्ता, विविध भाषेचे जाणते अभ्यासक, लेखक, तत्त्वनिष्ठ, धर्मनिरपेक्ष राजा म्हणून त्यांचा उल्लेख इतिहासात केलेला आहे
म्हणून आपणास विनंती आहे की त्या ठिकाणी धर्मवीर नावाच्या जागी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असा करण्यात यावा
सदर निवेदन देण्यासाठी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील संभाजीब्रिगेड जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी शिवश्री मुकेश तुपे संभाजी ब्रिगेडचे मा.जि.गणेश पाटील एस ए पाटील जिभाऊ पाटील विजय जाधव रवींद्र पाटील अनिल मराठे किशोर पाटील हरी पाटील योगेश पाटील रणजीत पाटील आबा येवले किशोर डोंगरे शशिकांत मोरे रईस बागवान भिवा आबा सचिन पाटील बापू भोई रवी ठाकूर धीरज कुमार कुशावाहा यावेळी उपस्थित होते.