श्रध्देव तात्यासाहेब आर.ओ. पाटील यांच्या ‘विजयादशमी’ जयंती निमित्त
निःशुल्क भव्य योगासन व प्राणायम महाशिबिर
पतंजलि योग समिति हरिव्दार येथील राष्ट्रीय किर्तीचे प्रसिध्द योगशिक्षक / गुरु परमुशिष्य विद्वान युवा सन्यासी पुज्य स्वामी विप्र देव जी महाराज, पुज्य स्वामी यज्ञ देव जी महाराज यांचे निःशुल्क शिविर
पतंजलि योग समिति महिला पतंजलि योग समिति Art of living
भारत स्वाभिमान, युवा भारत, पतंजलि किसान सेवा समिति
सन्माननीय श्री.जय महाराष्ट्र ! मंगलमयी नवरात्री उत्सव व आनंददायी विजया दशमी पर्वा निमित्त आपणास मंगलमय हार्दिक शुभेच्छा !
या जगण्यावर शतदा प्रेम करावं असं या पृथ्वीवरचं हे सुंदर मानवी जीवन ! पण आज नवे आविष्कार, शोध, मोबाईल, इंटरनेट, संगणक व तंत्रज्ञानाच्या झपाटलेपणा मुळे माणूस एकांगी बनत असून समाजापासून तुटत आहे. त्याचं राहणीमान उंचावलं पण जगणं असह्य झालंय. इमारतींची उंची वाढली पण माणुसकी खुजी झाली. आजच्या अतिशय व्यस्त व धकाधकीच्या जीवनामुळे माणसाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. अनेक ताणतणावांमुळे मानसिक आरोग्य बिघडले. व्यायामाचा अभाव व आरोग्याविषयीची अनास्था यामुळे आपले जीवन अल्पायुषी न ठरता दीर्घायुषी व्हावे यासाठीच हे आयोजन.
विजयादशमी म्हणजे श्रध्देय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांचा जन्मदिवस अर्थातच प्रेरणा दिवस ! त्यांच्या जयंती प्रित्यर्थ त्यांच्या जीवनाचा, कृतीचा व विचारांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन आम्ही लोकांच्या आनंदी, सुखी व निरोगी आरोग्यासाठी निःशुल्क भव्य योगासन व प्राणायम महाशिबिराचे आयोजन केले आहे. योगा व प्राणायमाचा विचार हा समाज मनाला राष्ट्रीय चारित्र्य देणारा आहे. प्रत्येकाच्या देहात चैतन्याचा पाझर फोडणे आणि लोकांना सन्मार्गाला लावून त्यांचे आरोग्य निरोगी ठेवणे हा उद्देश आहे. तरी आरोग्याची काळजी म्हणून आपण स्वत: आपल्या परिवारासह व मित्रमंडळीसह या महाशिबिराचा लाभ घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
– शिबिर तारीख व वेळ
दि. १ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर २०२२, दररोज सकाळी : ५:३० ते ७ वा.
स्थळ
एम.एम. कॉलेजचे भव्य मैदान, वीर महाराणा प्रताप चौक, पाचोरा
आयोजक : सौ. वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी
शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटना पदाधिकारी, लोक प्रतिनिधी, संभाजी ब्रिगेड पदाधिकारी पाचोरा, विधानसभा मतदार संघ पाचोरा भडगाव