शिंदे गट शिवसेना – युवा सेनेच्या कुरंगी बांबरुड गटाचा जनसंवाद मेळाव्याला उदंड प्रतिसाद
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मांडला विकासाचा व्हिजन
राजेंद्र पाटील सर नांद्रा (ता.पाचोरा) ता.5येथील श्रीराम टेकडीवर जि.प.प.स.शेतकरी संघ, मार्केट कमिटी च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कुरंगी – बांबरुड जि.प.गटाचा शिवसेना – युवासेनेचा जनसंवाद मेळावा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला . प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष रावसाहेब पाटील,तालुका प्रमुख सुनील पाटील, मा.जि.प.सदस्य पदम बापू पाटील, खेडगाव पंढरीनाथ पाटील, प्रविण ब्राम्हणे पाचोरा,कुरंगी चे पंढरीनाथ गोविंदा पाटील, भडगाव चे सुधाकर पाटील,भुरा पाटील, योगेश पाटील,गणेश पाटील, सुभाष तावडे, विनोद तावडे, शिवाजी तावडे,डि.के.पाटील, इम्रान पटेल, विश्वनाथ सुर्यवंशी, योगेश सुर्यवंशी, रमेश पाटील निभोरी, बापू धनराज पाटील माहेजी, हेमराज पाटील मोहाडी,जयविर पाटील दहिगाव, योगेश पाटील डोकलखेडा, सुनिल पाटील कुरंगी,डॉ शेखर पाटील, अशोक बडगुजर, युवराज काळे, प्रकाश चौधरी, रोशन पदम पाटील, स्वप्निल सुभाष तावडे,मुराद तडवी यांच्या सह.शिवसेना युवा सेना दिनकर सोनवणे,शरद पाटील ,किरण पाटील , रोहित पाटील,यांच्या सह शिवसेना युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.माहेजी ते हनुमंतखेडा गिरणा नदीवरील पुलासाठी विस कोटी चार निधी मंजूर केला म्हणून जि.प.गटातील सर्व ग्रामपंचायतींच्या वतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.जिल्हाअध्यक्ष रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले आम्ही गद्दार नसुन खुद्दार आहेत.पंचवीस वर्ष राष्ट्रवादी व काँग्रेस घ्या विरोधात आम्ही संघर्ष केला.त्यांच्या सोबत आम्ही सत्तेत सहभागी झालो आधी एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ नेता म्हणून घोषित केले.आणि वेळेवर महाविकास आघाडी घ्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साधा ग्रामपंचायत चार सुद्धा अनुभव नव्हता.उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करुन आपण सरकार चालवण्याचे मनसुबे यांचे होते.आम्ही वारंवार तक्रार करूनही या कडे दुर्लक्ष करण्यात आले.म्हणून एक नव्हे तब्बल चाळीस आमदार विरोधात गेले की गेल्या अडीच वर्षांपासून थांबलेल्या विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मी शिंदे घटत गेलो . मुख्यमंत्री शिवसेनेचा असतांना कमी प्रमाणात निधी मिळत होता.शिवसेना भाजप सरकारने दिंडी महिन्यात आपल्या पाचोरा भडगाव मतदारसंघात पंच्यायशी कोटी चार निधी मंजूर केला.त्यात माहेजी येथील गिरणा नदीच्या पुलासाठी विस कोटी चार निधी या गटासाठी दिला.तरुणांसाठी मतदारसंघात दोन कोटी रुपयांचे व्यायामाचे साहित्या साठी निधी मंजूर केला असुन ते साहित्य लवकर वाटप करण्यात येणार आहे.दहीगाव ते प्रिंप्री गिरणा नदीवरील पुलासाठी लवकर निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.वनविभागातील वन्य प्राणी शेतकऱ्यांचा पिकांचे मोठ्या नुकसान करतात त्या वनविभागाला संरक्षण करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच वालकुंपणाला मंजुरी मिळणार आहे,त्याच बरोबर बहुळा धरणावरुण पहाण, आसनखेडा लासलगाव प्रयत्न नवीन पोटचारीचा प्रस्ताव सादर सादर करुन त्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.मतदार संघातील आठशे किलोमीटरच्या शेत रस्ते सुद्धा मंजूर करण्यात आले आहेत.या साठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.नाराज शिवसैनिकांना भेटुन त्यांच्या नाराजी दूर करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे मी मोठ्या प्रमाणावर विकास निधीतुन मोठ्या प्रमाणावर मतदारसंघात विकास केलेला असल्याचेही आपल्या भाषणात अधोरेखित केले.सुत्रसंचलन नगराज पाटील,प्रा.यशवंत पवार तर आभार मा.जि.प.सदस्य पदमबापु पाटील यांनी मानले.