पाचोर्यातील घोडके परिवारांचा गणपती मूर्ती बनवण्याचा उपक्रम हा गेल्या 70 वर्षापासून असलेली परंपरा परिवाराने आजही जपला आहे
यंदा विघ्नहर्त्याची कृपा…. मूर्तिकार आनंदित
पाचोऱ्याच्या घोडके बंधूच्या गणेशाला परप्रांताही मोठी मागणी
पाचोरा – कोरोनाच्या काळात गेल्या दोन वर्षांपासून सण उत्सवांसाठी जाहीर झालेली नियमावली आणि प्रतिबंध पूर्णपणे उठवल्यामुळे यंदा गणेश मूर्ती बनवणाऱ्या कलावंतांवर विघ्नहर्ताची कृपा झाली असून मूर्तिकार वर्गामध्ये आनंद असल्याचे बघायला मिळत आहे. दोन वर्षानंतर गणेश उत्सव धडाकेबाज सुरू होणार असल्यामुळे मूर्ती खरेदी करण्यासाठी देखील उत्साह दिसून येत आहे.
मागील वर्षात गणेश मूर्तींच्या उंची आणि आकार याबद्दल नियमावली असल्यामुळे तयार झालेल्या मोठ्या आकाराच्या मुर्त्या कारखान्यात तशाच ठेवाव्या लागल्या होत्या तर मोठ्या मुर्त्यांना मागणी देखील नव्हती परंतु यावर्षी शासनाने सर्वच निर्बंध उठवल्यामुळे गणेश मुर्त्यांना मोठी मागणी असून पंधरा दिवस आधीच गणेश मूर्ती बुक झाल्या असून पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्याने जिल्हाबाह्य बुकिंग पंधरा दिवसापासून बंद केले असल्याची माहिती येथील गणेश मूर्तीचे कारखानदार गोपाळ घोडके आणि राजू घोडके यांनी दिली.
मागील वर्षे मूर्तीच्या उंचीची मर्यादा निश्चित केली असल्यामुळे अधिक उंचीच्या मुर्त्या तयार केलेल्या नव्हत्या आणि यावर्षी सर्व निर्बंध शिखर केल्याच्या सूचना शासनाकडून उशिरा प्राप्त झाल्यामुळे अधिक उंचीच्या मुर्त्या मोठ्या प्रमाणात तयार करता आल्या नाहीत तरीदेखील या कारखान्यात सहा इंचापासून सोळा फुटापर्यंत मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.या दोन्ही कारखान्यात तयार होणाऱ्या गणेशाच्या मुर्त्यांना गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांसह जळगाव व्यतिरिक्त धुळे,नाशिक, नगर, औरंगाबाद, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यात देखील मोठी मागणी आहे परंतु रंग आणि कच्चामाल यांचा दर वाढल्यामुळे देखील मूर्तींच्या किमतीत १५ ते २५ टक्के इतकी वाढ झालेली आहे.
विविध स्वरूपातील गणेश मूर्ती भक्तांना आकर्षित करत असून श्रीराम स्वरूप, बालाजी, महादेव स्वरूप तसेच दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा,विठ्ठल अशा विविध स्वरूपातील गणेश मूर्ती भक्तांना मोहित करतात.याशिवाय किंमत जास्त असली तरी शाडूच्या माती पासून तयार केलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीला मोठी मागणी आहे.
घोडके बंधूंचे वर्षभर अथक परिश्रम
पाचोरा शहरासह अनेक जिल्ह्यांना पाचोरा शहरातील घोडके बंधू यांचे मूर्तीचे कारखाने सुपरिचित असून या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्तींना मोठी मागणी असते म्हणूनच जवळपास वर्षभर राजू घोडके आणि गोपाल घोडके हे दोन्ही कुटुंब कारखान्यात आकर्षक आणि मोहक मुर्त्या निर्माण करण्यासाठी स्वतःला झोकून देतात.,वैभव घोडके,गौरव घोडके,प्रमिला घोडके, शैला घोडके तसेच गोपाळ घोडके यांचे विजय घोडके,संजय घोडके,आदित्य घोडके
हे संपूर्ण परिवार पूर्ण दिवस कारखान्यात राबवून विविध आकारातील गणेश मूर्ती घडवतात. गणेशाचा आकार जरी साच्यातून निर्माण होत असला तरी रंगकाम करणे खूपच कौशल्याचे काम असून गणेशाचे डोळे रंगकाम करणे हा गणेश मूर्तीतील सर्वात कौशल्याचा भाग असल्याचे दोन्ही कुटुंब सांगतात.