नांद्रा येथे विविध स्कूल मध्ये योगा दिवस उत्साहात संपन्न
नांद्रा ता. पाचोरा (वार्ताहर ) येथील विविध प्राथमिक माध्यमिक व रे टू स्कूल या ठिकाणी योग दिवस निमित्त विविध योगासने व प्राणायाम करून विद्यार्थ्यांना हसत खेळत निसर्गाच्या सानिध्यात योगा उत्साहात शिकवण्यात आले याप्रसंगी धी शेंदुणी सेकडरी एज्युकेशन को आॅप सोसायटी ली शेंदुणी संचालित अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयात नांद्रा येथे २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.सदर प्रसंगी शाळेच मुख्याध्यापक आर एस चौधरी यांनी योगासनाचे महत्व.त्याचे फायदे विशद केले.मास्टर टेनर जे डी पाटील.आर एम राठोड.जी ए ठाकूर यांनी प्रात्यशिक दाखविले.
विद्याथी कडून उभी आसने. बैठी आसने. पोटावरीर आसने. पाठीवरील आसने करून घेतली.मुख्याध्यापक, पयऀवेक्षक एस व्ही शिन्दे एल एम पाटील.सवऀ शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले. याबरोबरच प्राथमिक शाळा नांद्रा या ठिकाणीही मुख्याध्यापिका व शिक्षिका वृंद यांनी विविध योगासने विद्यार्थ्यांना करून मार्गदर्शन केले याबरोबरच क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांना संगीतमय वातावरणात विविध योगासने, बैठे प्राणायाम निसर्गाच्या सानिध्यात प्रात्यक्षिक करून उत्साहात आपल्या जीवनात योगाचे महत्व प्रा यशवंत पवार यांनी सांगितले याप्रसंगी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुंधती राजेंद्र, वैशाली पाटील,पुनम सोनवणे, नम्रता पवार, श्वेता बोरसे मोनिका इंगळे,सपना पूजा सूर्यवंशी, रोहन पाटील यांनी परिश्रम घेतले.