चोपडा तालुका दौऱ्यानिमित्त मौजे वढोदा येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची सदिच्छा भेट देऊन विविध कार्यक्रमात उपस्थिती.
चोपडा तालुका दौऱ्याच्या चौथ्या दिवशी मौजे वढोदा येथे आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदिच्छा भेट देऊन गावांतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. यावेळी जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस श्री. विनायक वसंतराव पाटील यांच्याकडे सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांसह *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* भोजन केले, तसेच श्री. पांडुरंग भागीरथ पाटील व डॉ. निलेश पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला व गावांतील विविध विकासकामे व समस्यांबाबत निवेदन स्वीकारून, संबंधितांना योग्यत्या सुचना केल्या.
तसेच “प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्र मोदीजी” यांचे मार्फत सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री पिक विमा, किसन रेल, जलजीवन मिशन योजना यासारख्या “केंद्र सरकारच्या” विविध योजनांबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती देऊन योजनेच्या लाभार्थ्यांशी व ग्रामस्थांशी चर्चा केली.
यावेळी श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह तालुकाध्यक्ष पंकज सुभाष पाटील, भाजयुमो जिल्हा चिटणीस मनोज सनेर, भाजयुमो ता.अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका चिटणीस भरत सोनगिरे सर, बुथप्रमुख विनायक पाटील, अमोल पाटील, भुषण पाटील, अविनाश पाटील, मिलिंद पाटील, समाधान पाटील, राहुल पाटील, अनिल पाटील, भावलाल वानखेडे व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक, महिला वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.