नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारा अभावी सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू:कारवाईची मागणी
पाचोरा (वार्ताहर) दि.८
तालुक्यातील नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याही प्रकारचे प्राथमिक उपचार न करता १०८ क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेने रुग्णाला पुढील उपचारासाठी रवाना केले जाते मात्र तत्पूर्वी कोणतेही प्रथमोपचार येथे केले जात नसल्याची तक्रार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील बदरखे येथील छोटीबाई सुरेश चित्ते यांना दिनांक ५ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास सर्पदंश झाला होता त्यांना तात्काळ गावातील लोकांनीं प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र तेथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते तसेच उपस्थित आरोग्य सेविकेने यांनी कोणत्याही प्रकारचे प्रथमोपचार न करता सरळ भडगाव रुग्णालयात दाखल करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली .रुग्णाला भडगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून तेथील डॉक्टरांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला असता त्यांचा मृत्यू झाला याला विलंबामुळे एका निरपराध महिलेला आपला जीव गमवावा लागला असून या प्रकारास सर्वस्वी नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी व कर्मचारी कर्मचारी दोषी असल्याचा आरोप नातेवाईक यांनी केला असून त्यांचेवर योग्य त्या कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही.