क्रिएटिव्ह स्कूल ला जागतिक महिलादिना निमित्त विविध क्षेत्रातील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
नांद्रा ता. पाचोरा (वार्ताहर ) येथे जागतिक महिला दिनानिमित्त चला खेळ खेळू या..व भरघोस बक्षीस जिंकूया.भव्य असा हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम व विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार व गौरव समारंभ नवनिर्माण बहुद्देशीय मंडळ व सरजी फाउंडेशन नांद्रा यांच्याद्वारे दिनांक 8 मार्च वार मंगळवार सकाळी 9.वाजता क्रिएटिव स्कूल येथे उत्साहात संपन्न झाला व हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आलेल्या जवळजवळ 100 माता-भगिनी यांना स्पून सेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला याबरोबरच संगीत खुर्ची,लिंबू चमचा, उखाणे, एक मिनिट,अशा विविध स्पर्धांमधील स्पर्धक भगिनी यांना वेगवेगळे बक्षिसे देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचं उद्घाटन ताईसॊ सरपंच आशाताई भिकन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार पल्लवी भोगे पाटील ग्रामपंचायत सदस्य सोनम तावडे, मनीषा शिवाजी तावडे, विनोद भाऊ तावडे,आनंदा बाविस्कर, योगेश सूर्यवंशी, बंटी सूर्यवंशी, भाऊसाहेब बाविस्कर,किशोर खैरनार, सुभाष अण्णा तावडे उपस्थित होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संचालिका नम्रता यशवंत पवार या होत्या विशेष सत्काराथी म्हणून प्रा. आरोग्य केंद्र नांद्रा येथील कोरोना काळात आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व महिला आरोग्य सेविका व पर्यवेक्षिका ताई अलकाताई वाघ शैलाताई गड्री, संगीता ताई कावळे, अनुराधा सपकाळे,उज्वला कोळी सुनीता शिंदे,मायाताई सोनवणे, तर आशा स्वयंसेविका मध्ये सुनिता राजेंद्र पाटील, प्रतिभा वाल्मीक सोनवणे,दीपाली ज्ञानेश्वर पाटील यांचा ई सेवा केंद्र प्रणाली ओमभाऊ पवार,रुपाली विनोद बाविस्कर यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू शाल,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी चला खेळ खेळूया या कार्यक्रमात उखाणे,संगीत खुर्ची, लिंबू चमचा, एक मिनिट, वकृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून विजेते ठरलेल्या महिला त्यामध्ये उज्वला कैलास सूर्यवंशी, जयश्री कैलास पवार, आरती ज्ञानेश्वर सूर्यवंशी, जयश्री कैलास पाटील, योगिता तुषार जावळे ,सपना प्रजापती,अपेक्षा पाटील,प्रियंका पाटील, लताबाई महाले, सुरेखा नाकवे,योगिता जावळे, चेतना मनोज पाटील,कोमल डिगंबर सूर्यवंशी, प्रगती नामदेव पाटील, यांना विविध बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात याबरोबरच या कार्यक्रमाला महिला सबलीकरण व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विषयावर सामाजिक कार्यकर्ता, तथा पत्रकार पल्लवीताई भोगे (पाटील )जळगाव यांनी आपले मनोगत पर मार्गदर्शन केले याबरोबरच स्कूल ला वर्षभरात घेतलेल्या विविध ऑनलाइन /ऑफलाइन, सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची विजेते विद्यार्थी यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व बक्षीस देवून गौरवण्यात आले याबरोबरच विद्यार्थ्यांना ही स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाला कार्यक्रमाला नांद्रासह कुरंगी, माहेजी,वरसाडे,आसनखेडा,पहांन,लासगाव, सामनेर, बांबरुड येथील महिला पालक प्रतिनिधी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिकावृंद अरुंधती राजेंद्र व मनीषा बडगुजर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.यशवंत पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन नम्रता पवार यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उज्वला महाले,पूजा सोनजे,सुभाष पिंपळे यांनी परिश्रम घेतले