*वरखेडी येथील गुरुवारी भरणारा आठवडे बाजार रद्द*
– नियम मोडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
*पाचोरा, प्रतिनिधी* !( प्रमोद बारी, )
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे प्रत्येक गुरुवारी आठवडे बाजार भरतो येथील गुरांचा बाजार महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यातही प्रसिद्ध असल्याने लांबलांबून वराचसा व्यापारी वर्ग येत असतो याची दखल घेत कोरानाचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी जाहीर झालेल्या नियमांचे पालन व्हावे म्हणून शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला असून खालील प्रमाणे नियम व अटी लागू करण्यात आल्या असून जनतेने सहकार्य करावे असे अवाहन वरखेडी ग्रामपंचायतीने केले आहे.
कोरोनाचा प्रादुरभाव वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये दिनांक ६ मार्च पर्यंत रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी (नाईट कर्फ्यु ) लागू करण्यात आला आहे. तसेच लग्न कार्यासाठी सबंधित पोलीस स्टेशनची व ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असून फक्त ५० लोकांच्या उपस्थिती ची परवानगी देण्यात येईल. तसेच गर्दी जमा होईल असे इतर सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम, मेळावे, सभा संमेलन इत्यादी कार्यक्रमावर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडील पुढील आदेश येई पर्यंत दर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार बंद राहील.तसेच वरखेडी गावातील ग्रामस्थ व कामानिमित्त वरखेडी बाजारपेठेत येणाऱ्या पंचक्रोशीतील सर्व जनतेसाठी मास्क वापरणे, सोशअल डिस्टन्सिंग चे पालन करणे, व सॅनीटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आलेले असून वरील सूचनांचे पालन न केल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येतील व दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे अवाहन सरपंच व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत वरखेडी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.