पाचोऱ्यात न.पा. घरपट्टी विरोधात कॉंग्रेस मैदानात :मोफत हरकती नोंदवा कॉंग्रेस चे सचिन सोमवंशी यांचे आवाहन
पाचोरा (प्रतिनिधी) – येथील नगर परिषद ने एकत्रीकरण टॅक्स वाढी संदर्भात नोटीस बजावली असून याच्या विरोधात कॉंग्रेस मोफत हरकती नोंदवण्यासाठी मैदानात उतरली असुन कोरोना मुळे आहे त्या टॅक्स मध्ये पन्नास टक्के सुट द्यावी अशी मागणी केली आहे.
*येथील नगर परिषद ने सन २०२०ते २०२४ पर्यंत चा एकत्रीकरण टॅक्स हा दहा टक्के ने वाढविण्यासाठी शहरातील जवळपास विस ते पंचवीस हजार घरे, दुकाने, आदी मालमत्ता धारकांना नोटीस न. पा. अधिनियम १९६५ च्या नियमाने बजावली आहे. मात्र शहरातील भोळ्या भाबड्या नागरींकाना या नोटीस चा अर्थच कळला नाही. सदर नोटीस वर हरकती १७ डिसेंबर पर्यंत मागविण्यात आल्या आहेत. सदर ची मुदत ही पुरेशी नसल्याने वाढवुन द्यावी अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी केली असून यावर प्रत्येक नागरिकांनी आपली टॅक्स ची पावती शहरातील नवकांर प्लाझा येथील सचिन मेडीको येथे जमा करायची असुन जमा करते वेळी आपणास हरकत चा अर्ज मोफत मिळणार आहे त्यावर सही द्यायची आहे. कोरोना महामारीमुळे मुळे शहरातील व्यापारी पेठ उध्वस्त झाली असून न. पा. ने आहे त्या टॅक्स मध्ये पन्नास टक्के सुट द्यावी अशी मागणी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे नागरींकाच्या सही ने देण्यात येणार असल्याचे श्री सोमवंशी यांनी सांगितले आहे. मालमत्ता धारकांनी जर हरकत घेतली नाही तर आपल्या ला टॅक्स मान्य आहे असे समजले जाईल म्हणून प्रत्येकाने निष्काळजीपणा न करता तात्काळ कॉंग्रेस पक्षाच्या मोफत हरकत मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन कॉंग्रेस कडुन करण्यात आले आहे*