निषेध सभा वीज कर्मचारी-अभियंते व अधिकारी संघटनांची राज्यस्तरीय संघर्ष समिती

निषेध सभा वीज कर्मचारी-अभियंते व अधिकारी संघटनांची राज्यस्तरीय संघर्ष समिती

निषेध सभा जळगांव परिमंडळ
दि.१० आगष्ट २०२१ सकाळी १० वाजता

सुधारित विद्युत कायद्या २०२१ च्या विरोधात नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज अँड इंजिनिअर्स च्या आवाहनानुसार १० ऑगस्टच्या संपात सहभागी जळगांव परिमंडळ मधील सर्व संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची निषेध द्वार सभा सकाळी १०.०० वाजता विद्युत भवन ,अजिंठा रोड ,औद्योगिक वसाहत जळगांव येथे संपन्न झाली. १)वीज कायदा २०२१ दुरूस्ती विधेयक रद्द करणे,
२)वीज उद्योगांचे खाजगीकरण व फ्रैंचाईसीकरण धोरण रद्द करणे.
३) कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगारांना कायम करणे
या प्रमुख मागण्यांसाठी दि.१० अॉगष्ट, २०२१ राष्ट्रीय पातळीवरचा एकदिवसीय संप १०० टक्के यशस्वी करण्याचा सर्व सहभागी संघटनांतर्फे आवाहन व निर्धार करण्यात आला होता .परंतू विद्युत कायदा २०२१ सुधारणा विधेयक मान्यतेसाठी संसदेच्या चालू अधिवेशनात पटलावर घेण्यात येणार नाही असे केंद्र सरकार तर्फे जाहीर करण्यात आल्यामुळे नियोजित संप तूर्त स्थगित करण्यात आला असून राज्य स्तरीय संघर्ष समिती च्या निर्देशानुसार कृति समिती मधील सहभागी संघटनांचे स्थानिक पदाधिकारी सभासद कामगार कर्मचारी अधिकारी अभियंते यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी द्वार सभा घेऊन विरोध नोंदविला. ✊✊✊
. या द्वार सभेला सर्व संपकरी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले .
********************************** प्रामुख्याने वर्कर्स फेडरेशन चे परिमंडळ सचिव कॉ.विरेंद्र पाटील यांनी केंद्र सरकारच्या दुटप्पी ,कामगार विरोधी व भांडवलशाही प्रवृत्ती वाढीस लावण्याच्या धोरणाचा तीव्र निषेध नोंदवला .फक्त वीज विधेयक दुरूस्ती साठी एकट्या फेडरेशन ने मागील दोन वर्षात चार वेळा स्वतंत्र रित्या संप केला अशी आठवण जागृत केली.कधी नव्हे ती अभुतपूर्व ,अभेद्य अशी २३ संघटनांची वज्रमूठ उगारून लाईटनिंग स्ट्राईक चा जोरदार ठोसा लगावून केंद्र सरकारला भानावर येऊन ,सदर विधेयक पटलावर ठेवण्या पासून सद्या तरी परावृत्त व्हावे लागले हा आपल्या संघर्ष समितीचा विजय असल्याचे प्रतिपादन केले.परंतू सावध राहुन संघर्ष समितीचे नजिकच्या काळात येणारे आवाहनास सक्रीय प्रतिसाद व सहभागी व्हावे असे आवाहन केले.बहुजन विदूयुत अभियंता अधिकारी कर्मचारी फोरम चे परिमंडळ सचिव श्री विजय सोनवणे यांनी भांडवलशाही वाढीस लावणारे केंद्र सरकार व त्यांचे धोरण हे वीज ऊद्योगास घातक असून त्यांचेवर विश्वास न ठेवता आपले आंदोलनाची धार तीव्र ठेवून पुढील दिशा निर्देश नुसार वाटचाल सुरू ठेवली जाणे अत्यावश्यक आहे असे मत मांडले. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे उपसरचिटणीस श्री आर आर सावकारे यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करतांना सांगितले की हे दुतोंडी सरकार असून बोलणे आणि कृति करणे या मध्ये सतत विसंगती निर्माण करून डाव साधणारे असून आपण सावध पणे पाऊल उचलून पुढील मार्गक्रमण करतांना आक्रमक पणे आंदोलन मधील सातत्य टिकविणे साठी सक्रीय राहणे आवश्यक असल्याचे मत मांडले.सबॉर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री पराग चौधरी यांनी सदर आंदोलनाची पार्श्वभूमी स्पष्ट करतांना सांगितले की विद्युत सुधारणा विधेयक २०२१ दुरुस्ती रद्द करणे सहीत तीन प्रमुख मागण्यांसाठी नॅशनल कोआर्डीनेशन कमिटीचे निर्दैशानुसार ३,४,५ आॅगष्ट २०२१ रोजी जंतर मंतर ,दिल्ली येथे सुरु असलेल्या निषेध व धरणे आंदोलन मध्ये सामिल होण्यासाठी स्वतः हजर असतांना आलेल्या अनुभवांचे कथन करतांना सांगितले की सनदशीर मार्गाने आंदोलन करणारे कार्य कर्ते पेक्षा त्यांना अडविणारे सुरक्षा दलाची संख्या पाचपट होती .यावरून केंद्र सरकारचा दडपशाही व दंडेलशाहीचा प्रत्यय प्रत्यक्ष अनुभवला आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री यांना वितरण कंपन्यांची बाजू मांडतांना परिस्थिती समजावून सांगितली असता वीज वितरण कंपन्या कडे करोडो रूपये थकबाकी व कर्ज बोजा आहे असे त्यांनी सांगितले .परंतू क्रास सबसिडी चे ७०००० करोड चे येणे केंद्र सरकारकडे बाकी आहे असे निदर्शनास आणून दिले असता त्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.१३ अॉगष्ट पर्यंत संसदेचे अधिवेशन असून येत्या तीन दिवसात कोणत्याही क्षणी विधेयक पटलावर ठेवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जोपर्यंत आपली प्रमुख मागणीवर निर्णय होत नाही तोपर्यंत संप फक्त स्थगित केला आहे .कोणत्याही क्षणी पुन्हा संप करावा लागू शकतो यासाठी सज्ज राहावे असे प्रतिपादन केले .सदर निषेध द्वार सभेत वर्कर्स फेडरेशन केंद्रीय महिला कार्यकारिणी सदस्या श्रीमती संध्या पाटील मैडम ,सर्कल अध्यक्ष कॉ.दिनेश बडगुजर ,
विभागीय अध्यक्ष जळगांव कॉ.प्रभाकर महाजन ,विभागीय सचिव कॉ.मुकेश बारी ,माजी सर्कल अध्यक्ष कॉ.भगवान सपकाळे,कॉ.श्रीमती विजया कोळी मैडम ,कॉ.किशोर सपकाळे,कॉ.रविंद्र धनगर,कॉ.देवेंद्र भालेराव,
कॉ.गणेश बाविस्कर ,कॉ.किशोर जगताप, एस.ई.ए.,बहुजन फोरम,वीज तांत्रिक कामगार संघटना व संघर्ष समिती सभासद पदाधिकारी उपस्थित होते.

कामगार एकता ज़िंदाबाद………….
आपले विनित
वीज कर्मचारी-अभियंते व अधिकारी संघटनांची राज्यस्तरीय संघर्ष समिती,जळगांव झोन.
——————————————————