आडळसे ता..भडगाव ग्रा.पं.उपसरपंचपदी सौ.वैशाली साळुंखे यांची बिनविरोध निवड….!!!!
आडळसे ता.भडगाव – नुकत्याच झालेल्या उपसरपंच पदासाठी सौ.वैशाली साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली.सदर प्रसंगी निवडणूक अधिकारी श्री.डी.एस.देवकर व श्री.एस.बी.जाधव यांनी कामकाज पाहिले.ह्या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच श्री.दिलीप शिवराम पाटील होते यावेळी सर्व ग्रा.पं. सदस्य व गावातील नागरिक बंधु बघीनी उपस्थित होते.वैशाली साळुंखे ह्या श्री.बी.डी.साळुंखे सर आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक गो.पु.पाटील विद्यालय कोळगाव तसेच चेअरमन पोहरे आडळसे वि.का.स.सो.यांच्या पत्नी आहेत.यावेळेस नवनिर्वाचित उपसरपंच सौ.वैशाली साळुंखे यांनी अशी ग्वाही दिली की मला मिळालेल्या पदांची गरीमा राखली जाईल व सामान्य जनतेला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत राहील,गावातील जनतेच्या मुलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहील.
नवनिर्वाचित उपसरपंच यांचे सर्व ग्रा.पं.सदस्य व गावातील नागरिक बंधु भगिनी यांनी तसेच श्री.नानासाहेब प्रतापराव हरी पाटील जळगाव जिल्हा बँकेचे संचालक चेअरमन किसान शिक्षण संस्था भडगाव,सौ.पुनमताई प्रशांत पाटील संचालिका दुध फेडरेशन जळगाव, श्री.प्रशांतराव पाटील अवर सचिव ग्रामविकास मंत्रालय श्री.जगदिश अशोक पाटील मानद सचिव माध्यमिक पतपेढी जळगाव श्री.शामकांत अशोक पाटील माजी नगराध्यक्ष भडगाव, संपूर्ण किसान परिवार भडगाव यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.