पाचोरा शहरा नजिक बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर : कॉग्रेस च्या मागणीला वनविभागाने घेतली दखल 

पाचोरा शहरा नजिक बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर : कॉग्रेस च्या मागणीला वनविभागाने घेतली दखल

 

 

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरा जवळ असलेल्या सारोळा बुद्रुक शिवारात बिबट्या सदृश प्राण्यांचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली असून वनविभागाने तात्काळ चौकशी करण्याची कॉग्रेस ने मागणी केली आहे.

 

 

 

 

शहरा लगत असलेल्या सारोळा शिवार येतो या परीसरात सचिन सोमवंशी यांच्या शेताच्या बाजुला असलेल्या किरण भदाणे हे आपल्या शेतात मक्याचे शेताला पाणी भरत असतांना अचानक बिबट्या सदृश्य प्राणी झोपलेला आढळून आला सबंधित शेतकरी ने बिबट्या च्या दहशतीतच आपल्या मोबाईलवरच फोटो काढून सचिन सोमवंशी सह इतरांना हि बातमी सांगण्यासाठी आला असता बिबट्या सदृश्य प्राणी ने पोबारा केला. बिबटय़ा च्या वार्ताने परीसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्या सद् शोध घेवुन जेरबंद करण्यात यावे अशी मागणी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली असता वनविभागाचे प्रमुख आर एस मुलाणे यांना कळविले असता ते आपल्या पथका सह पोहचले मात्र यावेळी शेतकऱ्यांने पाणी भरणा केल्यामुळे कोणतेही ठसे उमटलेले दिसले नाही यावेळी वनविभागाचे प्रमुख आर. एस. मुलाणे यांनी बिबट्या सदृश्य प्राणी फोटो वरुन दिसतो शेतकरींनी घाबरु नका बिबट्या ने आज पर्यंत लोकांवर हल्ला केलेला नाही आपल्या परिसरात असे काही आढळले तर तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा आपला रब्बी चा हंगाम आपण बिनधास्त शेतात काम करण्याचे आवाहन केले आहे.