महाराष्ट्राच्या पटलावर मानवसेवा संस्थेचे काम जाईल ईतका हातभार लावू : ॲड.अणुराधा येवले

महाराष्ट्राच्या पटलावर मानवसेवा संस्थेचे काम जाईल ईतका हातभार लावू : ॲड.अणुराधा येवले

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्राच्या राजपटलावर मानवसेवा संस्थेचे काम जाईल ईतका हातभार लावू असे प्रतिपादन अहिल्या नगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा महिला बालविकास समितीच्या सदस्या ॲडव्होकेट अनुराधा येवले मॅडम यांनी केले.त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथे मानवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या समाजातील गुणवंत महिलांना पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलत होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून चितळीचे जेष्ठ समाजसेवक ज्युनिअर बाबा आमटे हे होते.ॲडव्होकेट येवले मॅडम पुढे म्हणाल्या की गावातील कोणत्याच महिलेला कोर्टात आरोपी म्हणून येवू देवू नका.महिलाच महीलेला न्याय मिळवून देऊ शकते.आपल्या गावात बालविवाह होऊ देऊ नका.मुलांच्या शिक्षणाकडे भर द्या.ज्या गावातील तळागाळातील घटकातील व्यक्तीला पैसे नाहीत म्हणून न्यायासाठी वंचित रहावे लागते त्यांच्या साठी आम्ही गेल्या तेरा वर्षापासुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून काम करतो.प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे सर्व महिलांच्या हस्ते पूजन करून संस्थेचे अध्यक्ष सुनिल मतकर सर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा लेखाजोखा मांडला.उपस्थित सर्व महिलांचा साडी देउन सन्मान करण्यात आला.आणि समाजातील समाजसेवेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत महिलांना साडी, ट्राॅफी, आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये दादा पाटील राजळे महाविद्यालयांच्या प्राध्यापिका डॉ. निर्मलाताई रखमाजी काकडे यांना (आदर्श प्राध्यापिका),चितळी येथील अनिता बाबासाहेब आमटे यांना (आदर्श अंगणवाडी सेविका),तर नेहा दादासाहेब म्हस्के यांना (एम पी एस सी स्काॅलर स्टुडंट्स),मीरी येथील सौ अनुराधा सचिन झाडे यांना (आदर्श प्रशिक्षिका), देवळाली प्रवरा येथील अंबिका संतोष वीर यांना (आदर्श शिपाई) , कोपरे येथील अहिल्यादेवी महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सौ सुनिता मारुती घुले यांना (आदर्श बचत गट अध्यक्षा),निंबोडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ.मंगल राजेंद्र म्हस्के यांना (आदर्श नेत्या),शिवसेना तालुकाप्रमुख उबाठा,चितळीच्या सौ पार्वती शंकर शिंदे यांना (आदर्श सि.आर.पी.लिडरशिप) या प्रमाणे गुणवंत महिलांना त्यांच्या कामाची पावती म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आले.हा पुरस्कार प्रदान केल्यानंतर राजळे महाविद्यालयांच्या प्राध्यापिका निर्मलाताई काकडे मॅडम म्हणाल्या की ही संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे सुरवातीचे जसे छोटे स्वरूप होते तशीच असुन या संस्थेला फार मोठे उज्वल भविष्य आहे. हा पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद होत आहे.या पुरस्कारासाठी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या महिलांची नावे सुचविली होती.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देण्यात आलेल्या या महिला पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मोहोज खुर्दचे उपसरपंच संतोष पिसे,विजया कोरडे,भिंगारदिवे मॅडम, सातपुते सर, शिवकुमार वांढेकर, संजय मचे,आदर्श अंगणवाडी सेविका अलका मतकर,आशाताई मतकर, वैशाली मतकर,नंदा मतकर, कावेरी मतकर,विद्या वांढेकर,सारिका शेरकर,अलका दराडे, अनिता विरकर,सुमन धनवटे, द्रौपदा पिटेकर, देविदास मतकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.आभार शुभम मतकर यांनी मानले.