सतत प्रयत्न करा व आत्मविश्वास ठेवा यश नक्की मिळेल, गरिमा पाटील
आपल्या ध्येय प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करा व स्वत वर आत्मविश्वास ठेवा यश नक्की मिळेल असे प्रतिपादन एमपीएससी टॅक्स असिस्टंट परीक्षा उत्तीर्ण करणारी, पाचोरा शहरात राहणारी,गरिमा निकित पाटील यांनी केले. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिव रोजी मौलाना आजाद हाल,जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे आयोजित करण्यात आलेले एका सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम मध्ये ती बोलत होती. कोणतीही भाषेत शिक्षण प्राप्त केल्यास, भाषा यश प्राप्तीमध्ये किंवा शिक्षण मध्ये अडथळा ठरत नाही असे त्यांनी सांगितले. मातृभाषा मध्ये शिकल्यास शिकण्याची गती जास्त असते व विषयाचे आकलन करण्यास गती मिळते,असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांसमोर केले. सत्यनिष्ठा,इमानदारी वर ठाम राहून, चिकाटीने आपले यश प्राप्तीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून निकीत हिरालाल पाटील तसेच अध्यक्षस्थानी गोराडखेडा उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख शेख कदिर शब्बीर हे होते. त्यांनीही विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करून चांगल्या रीत्याने कार्यक्रम आयोजित केल्याने शिक्षक वृंदाचे प्रशंसा केली व विद्यार्थ्यांसाठी अश्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचे गरज वर भर दिले. सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी ग्रेडेड मुख्याध्यापक अब्दुल एजाज,आदित्य कुलकर्णी,शेख वाजिद, शाहेदा युसुफ, अंजूम कुरेशी, शाईस्ता देशमुख यांनी परिश्रम घेतले.