गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथे महिला दिनाचे औचित्य साधून _आई आणि मी (MOM AND ME)_ उपक्रम उत्साहात साजरा
दि.०८/०३/२०२५ शनिवार रोजी गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात महिला दिनानिमित्त आई आणि मी(Mom And Me) हा उपक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे पर्यवेक्षिका व संस्था संचालक सौ.नेहा प्रेमकुमार शामनानी यांनी स्वीकारले. या कार्यक्रमात महिला पालकांनी आपला विशेष सहभाग नोंदविला. त्यात महिलांसाठी रॅम्प वॉक, स्व:परिचय, नृत्य असे विविध उपक्रम घेण्यात आले. त्यात पालकांनी महिला सशक्तीकरणासाठी अनेक उपक्रम सादर केले. पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी मा.प्राचार्य श्री प्रेम शामनाणी सर व उपस्थित सर्व शिक्षिकांच्या हस्ते विविध बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित महिला पालकांनी विविध नाटिका व नृत्य सादर करून आजची महिला कुठल्याही स्तरावर मागे नाही हे सिद्ध करून दाखविले. त्याशिवाय महिला पालकांनी विविध मनोरंजनात्मक खेळांचा मनसोक्त आनंद लुटला .तसेच विद्यार्थिनींना स्व:रक्षणाचे धडे मिळावेत यासाठी शाळेतील स्पोर्ट्स शिक्षिका साक्षी पवार मॅडम यांनी शाळेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकविलेले कराटे , सेल्फ डिफेन्स प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केले. पालकांनी कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सौ.अमिना बोहरा यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान लाभले.