सरपंच साहेब तुम्ही ग्रामपंचायतीचे मालक नाहीत, तुम्हाला हिंदू मुस्लीम समाजात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी नाही तर गावात जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी लोकांनी खुर्चीवर बसवले आहे याचं भान ठेवा : ॲडव्होकेट अरुण जाधव

सरपंच साहेब तुम्ही ग्रामपंचायतीचे मालक नाहीत, तुम्हाला हिंदू मुस्लीम समाजात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी नाही तर गावात जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी लोकांनी खुर्चीवर बसवले आहे याचं भान ठेवा : ॲडव्होकेट अरुण जाधव

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ‌ जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीचा सरपंच हा त्या गावचा मालक नाही तर संविधानिक पद्धतीने निवड करून त्या गावाचा विकास करण्यासाठी व जनतेचे प्रश्न गावातच सोडविण्यासाठी लोकांनी त्यांना सरपंचाच्या खुर्चीवर बसवलेले असते.गावात हिंदू मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्यासाठी खुर्चीवर बसवले नाही तर गावात जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी खुर्चीवर बसवले आहे याचं भान श्रीक्षेत्र मढीच्या सरपंचांनी ठेवले पाहिजे असे उदगार वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट अरुण जाधव यांनी काढले.ते अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथील ग्रामपंचायतीने केलेल्या मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना मढी यात्रेत दुकानं बंद च्या ठरावाच्या विरोधात आवाज उठवताना बोलत होते.अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर या असंविधानिक ठरावाच्या विरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.वंचितचे नेते ॲडव्होकेट अरुण जाधव पुढे म्हणाले की मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना यात्रेत विक्री करण्यास मज्जाव केलेला तो ठराव हा चुकीचा असून घटनाक्रम नाही तर बेकायदेशीर आहे.श्री क्षेत्र मढी ही भटक्यांची पंढरी आहे.तेथे संपूर्ण देशभरातील भटके कानिफ नाथांच्या दर्शनासाठी येतात.तेथे येणाऱ्या कोणत्याही समाजाच्या भाविकांना रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही.या चुकीच्या ठरावाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने या निर्णयाविरोधात योग्य ती कारवाई करावी.ग्रामसेवक सरपंच, सदस्य यांच्या वर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. आणि संविधान विरोधी ठराव घेणारी ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी अंन्यथा आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्य व्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा ॲडव्होकेट अरुण जाधव यांनी दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ साहेब यांना निवेदन देऊन या ठरावाला विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसनराव चव्हाण सर यांनी ही मढी येथे भेट देऊन वंचित बहुजन आघाडी ही मुस्लिम समाजाच्या बरोबर आहे.मढीच्या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना दुकानं लावण्यासाठी कोण रोखतो तेच पहातो असा सनसनित जिल्हा प्रशासनाला इशारा दिला आहे. त्यामुळे मढीची यात्रा ही वादग्रस्त बनन्याची चिन्हे निर्माण झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे नेते ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे यांनी मढी ग्रामसभेत मुस्लिम समाजाच्या विरोधात केलेला ठराव हा घटनात्मक नाही तर तो असंविधानिक आणि बेकायदेशीर आहे. हा ठराव मंजूर करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.अंन्यथा थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागू असं स्पष्ट शब्दात ढाकणे यांनी सांगितले आहे.या संदर्भात पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे यांनी ठराव मंजूर करणारे ग्रामविकास अधिकारी लवांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून चोवीस तासांत उत्तर देण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाथर्डी पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकारी संगीता पालवे यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नेमली आहे.त्याचा चौकशी अहवाल तातडीने जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.माहीती अधिकाराचे जिल्ह्याचे कार्यकर्ते अशोक सब्बन,प्रतिक बारसे, युनुस तांबटकर,संध्या मेढे, फिरोज शेख,रवी सातपुते, राजेंद्र कर्डिले, ॲडव्होकेट अरीफभाई, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुमार भिंगारे, डॉ जालिंदर घीगे, सतिश गायकवाड यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन घटनात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.वंचित आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख यांनी सांगितले की मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना मढी यात्रेत दुकानं लावण्यासाठी बंदी केलेल्या ठरावामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.सरपंच पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला असा दोन समाजात भेदभाव करणारा आणि हिंदू मुस्लीम समाजात तेढ निर्माण करून भांडणं लावणारा ठराव संमत करता येत नाही. मढीची यात्रा ही सर्व अठरापगड जाती धर्माच्या लोकांची यात्रा आहे.सातशे वर्षांपूर्वी ची परंपरा आहे. हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या यात्रेत झालेल्या चुकीच्या ठरावामुळे दोन समाजांत असलेल्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत घालून दिलेल्या स्वातंत्र्य,समता,आणि बंधुता या सहिष्णुतेच्या तत्त्वांचा बाधा निर्माण झाली आहे. एकंदरीत मढी ग्रामपंचायत ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.मढी ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच यांच्या बरोबर तिन सदस्य आहेत आठ विरोधात आहेत.ते सदस्य म्हणतात आम्हाला अंधारात ठेवून हा ठराव घेण्यात आला आहे.मुळात ही ग्रामसभा लाभार्थ्यांना घरकुल मंजूरीचे पत्र देण्यासाठी बोलावली होती पण शेवटी अत्यंत घाईघाईने हा ठराव पारित करण्यात आला.पाथर्डी तालुक्यात हिंदु मुस्लिम वाद विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्हा प्रशासन या प्रकरणात तातडीने नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मढीच्या कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार साहेब यांनी सांगितले की ही यात्रा पाथर्डीचे प्रांताधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भरणार आहे. प्रांताधिकारी प्रसाद मते साहेब जो निर्णय घेतील त्या प्रमाणे आम्ही सर्व पदाधिकारी यात्रेचे नियोजन करणार आहोत.यात्रेत कोणाची दुकानं लावायची हा सर्वस्वी निर्णय हा प्रांताधिकारी यांचा राहील.यात्रेपुर्वी होणाऱ्या नियोजन मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील भाविकांची कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या नावाने जी बरखास्तीची मागणी केली जात आहे ती अत्यंत चुकीची आहे.असे कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवार साहेब यांनी सांगितले.मढीच्या यात्रेत मुस्लिम समाजाचे तिसगाव मधील अनेक रेवडी व्यापारी आहेत त्यांनी अगोदरच आपला लाखो रुपयांचा रेवडीचा माल कडक वाळवून तयार करून ठेवला आहे त्या मालाचे नेमकं काय करायचं हा प्रश्न व्यापारी वर्गाला भेडसावत आहे.जिल्हा प्रशासनाने योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मुस्लिम समाजातील व्यापाऱ्यांना मढी येथे व्यापार बंदी घातल्यास मढीतील वेगवेगळ्या समाजांतील अनेक व्यावसायाची काही दुकाने तिसगावात आहेत ती खाली करून घेतली जातील त्यांना ही व्यापार बंदी केली जाईल अशी चर्चा तिसगावातील व्यापारी वर्गात सुरू झाली आहे. तिसगावच्या विद्यमान सरपंच या मुनिफाताई शेख या आहेत.राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी व हिंदू मुस्लीम ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.