शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अ.नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे पंढरीचे निष्ठावान वारकरी वै.सदगुरु यादवबाबा वाघोलीकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने 17ते25 फेब्रुवारी या कालावधीत ह.भ.प. भाऊसाहेब महाराज भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व ह.भ.प.विष्णूपंत भालेराव,सुर्यभान महाराज केसभट, नवनाथ महाराज शिरसाठ,हरिश्चंद्र महाराज दगडखैर, हिवरे बाजार चे पद्मश्री पोपटराव पवार, क्रुष्णा महाराज ताठे, महेश महाराज आव्हाड, अशोक महाराज वांढेकर यांची प्रवचने तर सर्व ह.भ.प.अंकुश महाराज कादे, महंत बाबागीरी महाराज, स्वामी नित्यानंदगिरीजी महाराज, देविदास महाराज म्हस्के,भागवत महाराज उंबरेकर, अशोक महाराज कोंगे,निव्रुती महाराज मतकर,भालसिंग महाराज वाघोलीकर,यांची किर्तने होणार आहेत. गावातील दिंडी प्रदक्षिणे नंतर दिनांक 25/2/2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह.भ.प. महंत राम महाराज झिंजुर्के यांच्या काल्याच्या किर्तनाने या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे.वाघोलीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वै.यादवबाबा पुण्यतिथी सप्ताहाचे हे 48 वे वर्ष आहे.तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन वै.यादवबाबा वाघोलीकर संस्थानच्या वतीने ह.भ.प.अभिमंन्यु महाराज भालसींग आणि व्यवस्थापक रमेश महाराज दातीर यांनी केले आहे.