जनशक्ती विकास आघाडीची 31 पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील जनशक्ती विकास आघाडीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास समितीच्या माजी सभापती सौ.हर्षदाताई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव येथे आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकुण एकतीस पदाधिकाऱ्यांची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.या बैठकीत ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांची अध्यक्ष म्हणून तर जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील गावडे यांची महासचिव म्हणून फेरनिवड करण्यात आली.तर कार्याध्यक्ष म्हणून राम पोटफोडे यांची निवड करण्यात आली.तालुक्यातील चार विभागाचे माणिक गर्जे, लक्ष्मण गवळी, हरिश्चंद्र फाटे, भाऊसाहेब बोडखे, हे चार उपाध्यक्ष नेमण्यात आले.कार्यकारीणी सदस्य म्हणून ज्युनिअर आबासाहेब काकडे, लक्ष्मण घोंगडे, सचिन आधाटे, सखाराम घावटे, प्रभाकर मारकंडे,अफसर शेख, विश्वास ढाकणे,सुर्यभान घोरपडे,पंढरीनाथ यादव, आस्लम शेख, रमेश चितळे, रघुनाथ सातपुते, लक्ष्मण पाटेकर यांची निवड करण्यात आली. जनशक्ती आघाडीच्या मागासवर्गीय सेलच्या उपाध्यक्ष पदी देविदास रणदिवे, रामनाथ भालेराव यांची तर सचिवपदी भारत भालेराव, यांची निवड करण्यात आली.बोधेगाव शहर उपाध्यक्ष पदी प्रमोद तांबे यांची, सिराज सरदार शेख यांची तालुका कार्यकारिणी सदस्यपदी, शिवाजी लांडे यांची तालुका सचिवपदी, राजेंद्र फलके फलकेवाडी प्रमुख, जनशक्ती युवा विकास आघाडीच्या अध्यक्षपदी वैभव पुरनाळे, सचिवपदी अमोल टेकाळे तर कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिल उबाळे यांची तर उद्योग विकास प्रमुख म्हणून अशोक ढाकणे यांची निवड करण्यात आली. या एकतीस पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना शाल, श्रीफळ, आयडी कार्ड, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या सर्व नवीन निवडीच्या पदाधिकाऱ्यांचे माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.हर्षदाताई काकडे यांनी अभिनंदन केले आहे.या सर्व निवडी या तिन वर्षासाठी राहणार आहेत. या आघाडीची भविष्यातील रणनीती काय असणार आहे या संबंधी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे, महासचिव जगन्नाथ पाटील गावडे, कार्याध्यक्ष राम पोटफोडे यांनी संबोधित केले. या नंतर फक्त साडेबारा हजारापैकी निष्ठावान कार्यकर्त्यांचीच कामे केली जातील गद्दारांनी ईकडे फिरकू सुद्धा नये असे आवर्जून सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचे काम करताना या पदाधिकाऱ्यांची शिफारस असल्या शिवाय कोणतेही काम होणार नाही असेही यावेळी निक्षून सांगण्यात आले आहे.आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदाधिकारी निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.