पाचोरा येथे एस ए पाटील सर लिखित “सुराबा या कादंबरीचे” प्रकाशन

पाचोरा येथे एस ए पाटील सर लिखित सुराबा या कादंबरीचे प्रकाशन

 

 

19 फेब्रुवारी 2025 शिवजयंतीचे औचित्य साधून एका अनाथ मुलाच्या संघर्षमय जीवन प्रवासावर आधारित सुराबा या कादंबरीचे शिवजयंती उत्सव समिती पाचोरा अध्यक्ष मा. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. सुराबा हि कादंबरी आपल्या बालपणीच आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या सूर्यभान या पात्रावर आधारित आहे.जीवनात अनेक गोष्टींमुळे अपयश येत असते व आपण खचून जात असतो परंतु जीवनात कितीही संकटे आले तरी खचून न जाता आपला मार्गक्रमण करत राहावा हा संदेश ही कादंबरी देत असते या कादंबरीचा नायक सूर्यभान अर्थात सुराबा हा आई वडिलांचे छत्र गमावल्यामुळे अनाथ झालेला असून सुद्धा केवळ स्वर्गवासी आई वडिलांच्या इच्छेखातर आपल्या शिक्षणाची कास धरतो व कसा यशस्वी होतो याचा सुंदर व रंजक प्रवास या कादंबरीत वाचायला मिळतो. एस ए पाटील सर लिखित या कादंबरीचे प्रकाशन डॉ.बालाजी जाधव पंचफुला प्रकाशन संभाजीनगर यांनी केलेले आहे. या कादंबरीला श्री बी.एन.पाटील सर प्राचार्य ,प्रशासक बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा यांची प्रस्तावना लाभलेली आहे. या कादंबरीला हजारो वाचक लाभावेत अशा शुभेच्छा माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिलेल्या आहेत. या प्रकाशन समारंभ प्रसंगी मा.नगराध्यक्ष संजय गोहिल माजी सभापती नितीन तावडे नगरसेवक विकास पाटील सर सामाजिक कार्यकर्ते खलील देशमुख किशोर बारवकर मराठा सेवा संघाचे एस के पाटील सुनील पाटील किशोर पाटील संभाजी ब्रिगेडचे प्रवीण पाटील जिभाऊ पाटील गुरुकुल इंग्लिश मीडियम चे प्राचार्य प्रेम सर शारदा इंग्लिश मीडियम चे डी ए पाटील पिके शिंदे विद्यालयाचे एस व्ही गीते सर गो से हायस्कूलचे एन. आर. ठाकरे सर पी पी शिंदे विद्यालयाचे देशमुख सर माध्यमिक विद्यालय कृष्णपुरी किरण पाटील जागृती विद्यालयाचे सावंत सर तावरे विद्यालयाचे सोनवणे सर माध्यमिक विद्यालय नविन वस्तीचे एस्.बी.पाटील यासह विविध विद्यालयातील सन्माननीय मुख्याध्यापक व शिक्षक वृंद शिवप्रेमी तसेच विविध वेशभूषेतले विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. याप्रसंगी माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडुन वारकरी मंडळाचे अनाथ विद्यार्थ्यांना या अनाथ मुलावर लिखित सुराबा कादंबरीचा पाच पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. या कादंबरी प्रकाशन समारंभास मार्केट कमिटी सभापती गणेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.हा कार्यक्रम यशस्वीते साठी शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य तसेच देविदास सावळे व दीपक मुळे यांनी सहकार्य केले.