शिवजयंती व आमदार राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त कासार पिंपळगाव येथे रक्तदान आणि सर्वरोग निदान शिबिर संपन्न
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त कासार पिंपळगाव येथे रक्तदान आणि सर्वरोग निदान शिबिर संपन्न झाले.कासार पिंपळगाव ग्रामपंचायत आणि शिवजयंती उत्सव समिती
यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी कासार पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच मोनालीताई राजळे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले.नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शिवजयंती मंडळाच्या वतीने विधीवत पूजा करण्यात आली.आणि मंडळाच्या माध्यमातून उभारलेल्या शामियान्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सार्वजनिक आरती करून अहिल्यानगर येथील सावेडी परीसरातील इंडो आयरीश हाॅस्पिटल यांच्या सहकार्याने सर्व रुग्णावर वैद्यकीय उपचार करून मोफत औषधोपचार केले.रक्तदाब,रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी,हुदयरोग, पाठदुखी,कंबरदुखी, गुडघेदुखी,किडणी विकार,स्त्रियांचे आजार,दम्याचे आजार,डायलासेस तपासणी,ईत्यादी आजाराची तपासणी करून रुग्णांवर मोफत औषधोपचार केले.आयरीश हाॅस्पिटल यांच्या दवाखान्यातील सर्व डॉक्टर्स नर्सेस यांनी तातडीने सेवा देऊन रुग्णांना दिलासा दिला. यावेळी गावातील ग्रामस्थ उपचारासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वृद्धेश्वर साखर कारखाना येथे ही शिवजयंती साजरी करण्यात आली.आणि उपस्थितांना प्रिती भोजन देण्यात आले. पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पि एस आय जाधव व पोलिस कॉन्स्टेबल भगवान गरगडे आणि उकिरडे सह सर्व होमगार्ड आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.पंचक्रोषीतील अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.