श्री गो से हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री.गो.से.हायस्कूल.पाचोरा येथे आज दिनांक 19/2/2025 बुधवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन. आर. पाटील. व उप मुख्याध्यापक श्री.आर.एल. पाटील. यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच विद्यालयाच्या इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने शिवाजी चौक पाचोरा या ठिकाणी उत्कृष्ट लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन.आर पाटील. उपमुख्याध्यापक श्री.आर. एल.पाटील.पर्यवेक्षक श्री.ए.बी.अहिरे., सौ. अंजली गोहिल मॅडम, श्री.आर.बी.तडवी, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस. एन. पाटील, कार्यालयीन प्रमुख श्री. अजय सिनकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.