अबॅकस नॅशनल स्पर्धेत पाचोऱ्याचा गुंजन राऊळ भारतातून प्रथम
श्री समर्थ प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासही भारतातील बेस्ट सेंटर म्हणून सन्मानीत
पाचोरा (वार्ताहर) दि.4
नुकत्याच कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या प्रो ऍक्टिव्ह अबॅकस आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन 2025 मध्ये पाचोरा येथील श्री समर्थ प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस मधील आणि सावित्रीबाई परशराम शिंदे प्राथमिक विद्या मंदिर चा विद्यार्थी गुंजन कपिल राऊळ या विद्यार्थिनीने पाच मिनिटात 100 पैकी 100 गणिते अचूक सोडवून अबॅकस लेव्हल वन मधून संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल तिला प्रोऍक्टिव्ह अबॅकस चे डायरेक्टर गिरीश करडे,सारिका करडे, अजय मणियार ,राजेश लोचानी, तेजस्विनी सावंत यांच्या हस्ते सायकल, विजेता ट्रॉफी तसेच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या या कॉम्पिटिशनमध्ये भारतातील नऊ राज्यांमधून 2450 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता राज्यस्तरीय कॉम्पिटिशन मधील एक,दोन व तीन क्रमांक आलेले विद्यार्थी या कॉम्पिटिशन साठी पात्र होते. 6 मिनिटात शंभर गणिते सोडवणे असे या कॉम्पिटिशनचे स्वरूप होते क्लासेस मधील 16 विद्यार्थ्यांनी अनुक्रमे दुसरा ते अकरावा क्रमांक मिळवून पाचोरा येथील श्री समर्थ प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसचे नाव संपूर्ण भारतातून प्रसिद्ध केले. क्लासेसच्या या यशाबद्दल मास्टर ट्रेनर रवींद्र पाटील आणि सपना शिंदे यांना भारतातून बेस्ट सेंटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच मास्टर ट्रेनर रवींद्र पाटील आणि सपना शिंदे यांचे पालकांकडून कौतुक तसेच अभिनंदन करण्यात आले.
विजयी विद्यार्थ्यांमध्ये गुंजन कपिल राऊळ -पहिला क्रमांक (D कॅटेगिरी),आदित्य प्रशांत मंगरुळे -सहावा क्रमांक (A कॅटेगिरी),अनिता आनंद जाधव -तिसरा क्रमांक (A कॅटेगिरी),यश भटुकांत चौधरी -चौथा क्रमांक (D कॅटेगिरी),मंदार कमलेश पाटकरी -अकरावा क्रमांक (D कॅटेगिरी),ऋग्वेद रितेश सकळकळे -दुसरा क्रमांक (D कॅटेगिरी),यज्ञेश मनोज सोनवणे -तिसरा क्रमांक (D कॅटेगिरी),जीविका पवन प्रजापत -दहावा क्रमांक (D कॅटेगिरी),सिद्धेश मनोज सोनवणे -चौथा क्रमांक( E कॅटेगिरी) तनुश्री मिलिंद काटे -दुसरा क्रमांक (E कॅटेगिरी), समृद्धी संदीप पाटील- अकरावा क्रमांक (E कॅटेगिरी),नूतन बापू अहिरे- तिसरा क्रमांक (G कॅटेगिरी),देवांश प्रमोद महाजन- चौथा क्रमांक( E कॅटेगिरी), रिदम राहुल जैन- नववा क्रमांक( E कॅटेगिरी)
,आदिती दीपक पाटील -दहावा क्रमांक (E कॅटेगिरी),वरून राकेश पाटील -सातवा क्रमांक (E कॅटेगिरी),भुवनेश सचिन पाटील -सातवा क्रमांक (E कॅटेगिरी) यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.