मोनिकाताई तुम्ही काय पण सांगा भाउ म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू :ना.राम शिंदे

मोनिकाताई तुम्ही काय पण सांगा भाउ म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू :ना.राम शिंदे

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) आमदार मोनिकाताई राजळे तुम्ही काय पण सांगा भाउ म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, तुम्ही सरकार मध्ये सामील होण्यासाठी आणि तुमच्या मंत्रीपदासाठी माझ्या दालनात मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवू अशी ग्वाही महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सभापती माननिय नामदार प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांनी दिली.शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी दोन्ही तालुक्याच्या वतीने नामदार शिंदे यांची विधानपरिषदेचे सभापती म्हणून आणि ना.राधाक्रुष्ण विखे पाटील यांची जलसंधारण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाली त्या निमित्ताने जाहीर सत्कार समारंभ पाथर्डी येथे अप्पासाहेब राजळे सभागृहात आयोजित आयोजित केला होता त्या वेळी सत्काराला उत्तर देताना नामदार शिंदे यांनी वरील वक्तव्य केले. नामदार शिंदे म्हणाले की मी दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलो, विखे पाटील भाजपात आल्यावर दोन वेळा निवडून आले पण मोनिकाताई तुम्ही तर हॅट्ट्रिक साधत तिनं वेळा निवडून आल्या त्या सिनियर आहेत पण मंत्री झाल्या नाहीत अशी खंत व्यक्त करून घाबरू नका श्रद्धा आणि सबुरीच फळ मोठ मिळत,मला नाही मिळालं का! तुम्ही मंत्री नक्की व्हाल तुम्ही अजिबात काळजी करू नका, हा राम शिंदे पाथर्डी- शेवगावचे प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मतदार संघातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे.असे सांगताच उपस्थित मतदारांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. प्रारंभी प्रास्ताविकात आमदार मोनिकाताई राजळे यांनी मतदार संघातील अनेक प्रश्न मांडत दोन्ही तालुक्यातील ऊसतोड कामगार आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी एमआयडीसी आणायला पाहिजे असं दोन्ही मंत्र्यांना निक्षून सांगितले.जलसंधारण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर थेट बाळासाहेब थोरातावर निशाणा साधत ते आता कायमस्वरूपी भावी मुख्यमंत्रीच राहतील अशी नावं न घेता टीका टिप्पणी केली.माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे अप्पासाहेब राजळे यांचे मेहुणे आहेत. थोरात विखे यांचा संघर्ष उभा महाराष्ट्र पहात आहे. ना.विखे पाटील थोरातावर टीका करण्याची एकही नामी संधी सोडत नाहीत. ना.विखेंनी कालचा अर्थ संकल्प किती लोकांनी पाहिला असे विचारले असता उपस्थित पुढाऱ्यांनी खाली माना घालत उत्तर देण्याचं टाळलं.ना.विखेंनी सांगितले की मागणी न करता लाडक्या बहिणीसह प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा केले आहेत.प्रत्येक समाजातील घटकांना जपण्यासाठी या महायुती सरकारची जबाबदारी आहे. कुकडीच पाणी नेलं, जायकवाडीच पाणी गेलं अशी विरोधी महाविकास आघाडीच्या लोकांनी फक्त आता भांडणं लावायचीच काम सुरू केली आहेत असाही आरोप त्यांनी केला. पाथर्डी तालुक्यातील डी.वाय.चारी क्रमांक २ साठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. या जाहीर सत्कार समारंभासाठी लोळेगाचे बिरोबाभक्त बाबाजी बनसोडे भगत यांनी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजाच्या वतीने ना.रामजी शिंदे साहेब यांचा काठीन् घोंगडी देउन सत्कार केला. पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाषराव बर्डे यांना नाशिकमध्ये पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले.या सोहळ्यासाठी अभयराव आव्हाड , दिलिप भालसिंग, नंदकुमार शेळके, अशोक चोरमले,बंडू बोरुडे, रणजित बेळगे, संदिप पठाडे, ज्योती शर्मा, आशाताईं गरड, अंकुश गर्जे, रविंद्र वायकर, अशोक आहुजा, जेष्ठ नेते उद्धवराव वाघ,काशिनाथ पाटील लवांडे,आशुतोष शहाणे,अशोक गायकवाड, बापुसाहेब धनवडे, राहुल राजळे,जे.बी.वांढेकर,कचरू चोथे, यांच्या सह शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पाथर्डी शहरातील मुख्य रस्त्यावरून दोन्ही मंत्र्यांची वाजत गाजत सवाद्य मिरवणूक काढुन जे सी बी च्या सहाय्याने फुलांची उधळण करीत पुष्पवृष्टी केली. शेवटी आमदार राजळे यांच्या निवासस्थानी प्रिती भोजना नंतर मंत्र्यांनी हेलिकॉप्टरने मुंबई कडे प्रयाण केले.पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.