अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न सुरक्षा आणि स्वच्छता या विषयावर १ दिवसीय कार्यशाळा संपन्न

अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न सुरक्षा आणि स्वच्छता या विषयावर १ दिवसीय कार्यशाळा संपन्न

 

व्यावसायिकांना अन्न परवाण्यासाठी अर्ज करण्याचे सहायक आयुक्तांचे आवाहन

 

जळगाव दि.31  अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव कार्यालयामार्फत 30 जानेवारी रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव व सहायक आयुक्त्, समाज कल्याण, जळगाव विभागाच्या अधिपत्या खालील कार्यरत असणाऱ्या सर्व अनुदानित वसतिगृहे तसेच निवासी शाळा यामध्ये देण्यात येणा-या भोजन आहार यांच्या गुणवत्ता नियंत्रण करण्याकरिता त्या सर्व वसतिगृहे व शाळा यांना अन्न व औषध विभाग महाराष्ट्र शासन अन्न सुरक्षा आणि स्वच्छता या विषयावर १ दिवसीय कार्यशाळा ए.टी.आर. लॅबोरेटरी येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेअंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण कीट भारत सरकार मार्फत प्रमाणपत्र देण्यात आले.

 

यावेळी सं.कृ. सं.कृ., सहायक आयुक्त (अन्न) यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करताना विनापरवाना अन्न व्यवसाय करणे कायदयानुसार गुन्हा असून १० लाखापर्यंत दंडाचे कायदयात प्रावधान आहे, विनापरवाना अन्न व्यवसाय करणा-यांविरुद्ध कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सर्व अन्न व्यावसायिकांनी परवाना/नोंदणी करावी. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांकडे परवाना आहे, त्यांनी मुदतीच्या पूर्वी ऑनलाईन नूतनीकरण करुन घ्यावे. अन्यथा रुपये ६०००/- इतका दंड असून मुदत संपल्यानंतर परवाना रद्द होत असून व्यवसाय विना परवाना गृहित धरुन त्यांच्या विरुदध कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येते असे सांगितले.

तसेच अन्न परवाना व नोंदणीसाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. ज्यांची वार्षिक उलाढाल १२ लाखाच्या आत असेल अशा दुकानांनी अन्न नोंदणी करणे व ज्यांची वार्षिक उलाढाल १२ लाख किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा अन्न व्यावसायिकांनी अन्न परवानासाठी अर्ज करावा. असे आवाहन या कार्यशाळेत केले.

या कार्यक्रमास व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) सं.कृ. कांबळे, अन्न सुरक्षा श.म. पवार, स.न.बारी, वरिष्ठ लिपीक हे उपस्थित होते.