सर सय्यद अहमद खान वाचनालया तर्फे२६ जानेवारी संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित
जळगाव दिनांक २६ जळगाव मेहरून येथील सर सय्यद अहमद खान वाचनालया तर्फे२६ जानेवारी संविधान दिनानिमित्त लहान मुलांचा प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते डॉ.शरीफ बागवान होते. याप्रसंगी प्रमुख मान्यवर युसुफ खान बटाटे वाले, सलीम इनामदार, गुलाम दस्तगीर ,शेख रज्जाक खान परिवहन संघटना जळगाव, बाबू खान ,याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार सर सय्यद अहमद खान लायब्ररीचे सचिव अब्दुल रऊफ खान यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
व प्रास्ताविकात सर सय्यद अहमद खान लायब्ररी चे थोडक्यात माहिती सांगितले. सदर अध्यक्षीय भाषणात डॉ.शरीफ बागवान यांनी संविधान दिवस चे महत्व पटवून सांगितले व भारत माता की जय या विषयी अधिक माहिती दिली सर्वांनी ही माहिती खूप उपयुक्त मानली असे उदगार काढले. तसेचयावेळी लहान मुलांना चॉकलेट बिस्किट तसेच प्रश्नोत्तराचे स्पर्धांमध्ये प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुजाहीद शेख यांनी केले व ईदरीस शेख , यांनी आभार मानले मुबशीर युनूस पिंजारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले.