पाचोरा उर्दू शाळेत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा व मुलांची शाळा पाचोरा येथे शनिवार रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मतदार दिवसाचे महत्व, भारतीय निर्वाचन आयोग ची स्थापना, स्वतंत्र भारतात झालेले पहिले निवडणूक, स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन, व त्यांनी घेतलेला परिश्रम बद्दल माहिती देण्यात आली. स्वतंत्र भारतात झालेले पहिले निवडणूक,तयार झालेले पहिली निवडणूक यादी, पहिले निवडणूक मध्ये नागरिकांनी घेतलेला सहभाग, निवडणूक यशस्वी बनवण्यासाठी अधिकाऱ्यांनी घेतलेला परिश्रम याबद्दल माहिती देण्यात आली. मतदान बद्दल जनजागृती करण्यात आली. मतदान आपला हक्क आहे व भारतीय लोकतंत्रता बळकट करण्यासाठी आपल्याला ह्या मतदान हक्क बजवण्याची गरज आहे याबद्दल माहिती देण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मतदान दिवस साजरा करण्यासाठी मॉडल व चार्ट बनवलेले होते. उत्कृष्ट चार्ट बनवणारी पाचवी वर्गाचे विद्यार्थिनी इरम जावेद पिंजारी याला गोराडखेडा उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख शेख कदीर शब्बीर यांनी बक्षीस दिले. यावेळी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी शेख जावेद रहीम यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मतदान दिवसाची शपथ दिली. यावेळी ग्रेडेड मुख्याध्यापक अब्दुल एजाज रउफ, शाहेदा हारून, शाहेदा युसुफ, शाईस्ता देशमुख,अंजुम कुरेशी, सोएबा सातभाई,खिजरोद्दीन सातभाई, शाहिन शेख, सलाउद्दीन शेख, नसीम खाटीक,सुमय्या देशमुख,शबाना देशमुख,अस्मा बागवान,वाजिद शेख, कुलकर्णी सर, सुफियान रंगरेज,सलमा शेख,शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.